Goa Heavy Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Tree Branch Falls on Car Goa: पावसाच्या तडाख्यामुळे डिचोली-साखळी मुख्य रस्त्यावर धावत्या कारवर झाडाची फांदी कोसळली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: पावसाच्या तडाख्यामुळे डिचोली-साखळी मुख्य रस्त्यावर धावत्या कारवर झाडाची फांदी कोसळली. सुदैवाने या घटनेत कारचालक युवक, त्याची आई आणि बहीण सुखरूप बचावले. ही घटना शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्ये-सत्तरी येथील आई, मुलगा आणि मुलगी हे जीए-०४-एच-०१८१ क्रमांकाच्या कारमधून डिचोलीमार्गे पेडण्याकडे जात होते. सर्वेश सावंत हा कार चालवत होता. कुळण-कारापूर येथील ''आधार'' हॉस्पिटलजवळील जंक्शनवर पोहोचताच रस्त्याकडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडाची मोठी फांदी अचानक कारवर कोसळली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कारमधील तिघेही घाबरून गेले. मात्र, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत कारमध्ये अडकलेल्या आई आणि दोन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे हवालदार राजन परब यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारवर पडलेली फांदी कापून बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. हा अडथळा दूर करण्यास सुमारे अर्धा तास लागल्याने डिचोली-साखळी मुख्य रस्त्यावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decision: 'इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी'ची पुनर्रचना, राज्यस्तरीय शहरी विकास संस्थेला मंजुरी... मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय

NZ ODI Squad vs India: टीम इंडियाविरुद्ध भिडण्यासाठी न्यूझीलंड सज्ज! फिन अ‍ॅलन, लॉकी फर्ग्युसनसह अनेक खेळाडूंचं कमबॅक, पाहा संपूर्ण संघ

Government Job Fraud: दोषींची मालमत्ता जप्त करणार! तोतया आयुक्तप्रकरणी CM सावंत यांचे कडक कारवाईचे संकेत

America Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराची धक्कादायक घटना! 2 चिमुकले आणि 8 महिन्यांची गर्भवती महिला यांच्यासह 9 जणांचा मृत्यू VIDEO

Horoscope: शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस ठरणार खास! देवीच्या कृपेनं 'या' राशींच्या आयुष्यात येणार यश, धनलाभाच्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT