Pernem News  Dainik Gomantak
गोवा

Pernem News : प्रवासवर्णनात सामाजिक वास्तव असावे : प्रवीण बांदेकर

Pernem News : संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयात प्रवासवर्णनावर राष्ट्रीय परिसंवाद

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News : पेडणे, प्रवासातून आपल्या सभोवतालचे जग समजावून घेता येते. स्वतःचा शोध नव्याने घेता येतो. आपल्या मनातील कुतूहल शमविण्यासाठी प्रवास हे महत्त्वाचे माध्यम आहे.

मराठी भाषेतील बहुतांशी प्रवासवर्णने केवळ पर्यटन या उद्देशाने लिहिली असून मराठी प्रवासवर्णनात सामाजिक वास्तवाचा अभाव जाणवतो, अशी खंत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, प्रसिध्द कादंबरीकार आणि कवी प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली.

शोधनिबंधांचे सादरीकरण :

डॉ. विनय मडगावकर, डॉ. सुनेत्रा कळंगुटकर, स्नेहा देसाई, राधिका नागवेकर, दीप्ती फळदेसाई, सोनिया सावंत, स्नेहा मोरजकर, सोनल संकेत हळर्णकर, स्नेहा जांबोटकर, सारिका आडविलकर, डॉ. जयप्रभू कांबळे, दुर्गा जांभळे, शेफाली दळवी, श्रद्धा गवंडी, डॉ. नीता तोरणे, डॉ. भक्ती महाजन, आनंद कोळंबकर, अंजली नाईक, केतकी वझे, अस्मिता पायनाईक आदी प्राध्यापकांनी निबंधांचे वाचन केले.

बीजभाषक डॉ. सपकाळ म्हणाले

प्रवासवर्णनात प्रदेशत्व हा महत्त्वाचा घटक आहे.

भिन्न संस्कृतींचा भिन्न जाणिवांचा मिलाफ प्रवासवर्णनात आढळतो.

प्रवासासाठी वापरलेल्या साधनांच्या वापरातून प्रवासाची अनुभूती बदलते.

मराठीतील प्रवासवर्णने तीर्थाटन आणि पर्यटन केंद्री आहेत.

मराठीतील प्रवासवर्णनात उपेक्षितांचे जग क्वचित आढळते.

प्रवासवर्णने म्हणजे कोल्हापुरी भेळ आहेत.

माध्यमे बदलली की अनुभव बदलतो : प्राचार्या प्रवीणा केरकर

प्रवासातून त्या-त्या प्रदेशाचा भूगोल, इतिहास आणि संस्कृती कळते. भौगोलिकदृष्ट्या प्रवासाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपण प्रवासासाठी कोणते माध्यम वापरतो, तसा आपल्याला अनुभव मिळतो. माध्यमे बदलली की अनुभव बदलतो, असे महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रवीणा केरकर आपल्या मनोगतात म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

SCROLL FOR NEXT