Goa Casino: राज्य सरकारच्या तिजोरीत 820 कोटींची भर; कॅसिनो बंदीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित

Goa Casino: कसिनोंच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी सरकारकडून 1 कोटी रुपये आकारले जात आहेत.
Goa Casino Theft:
Goa Casino Theft:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Casino: गोवा आणि कॅसिनो हे एक समीकरण गेली काही वर्षांपासून बनले असून प्रामुख्याने राजधानी पणजी लगतच्या मांडवी नदीत हे कॅसिनो आलेल्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

कॅसिनोंवरून बऱ्याच वर्षांपासून वाद सुरु असून हे कॅसिनो बंद करावे अशीही मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे.

कॅसिनोमुळे तरुणपिढी बारबात झाली असायचा आरोप केला गेला असला तरी याच कॅसिनोंमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत बरच गल्ला जमा झाला आहे.

राज्य सरकारला कॅसिनोकडून मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 820 कोटीहुन अधिक रुपयांचा महसूल कर स्वरूपात मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

या महसुलामुळे सरकारच्या तिजोरीत मोठी वाढ झाली असल्याने राज्यातील कसिनो सध्यातरी बंद करणे सरकारकडून शक्य नसल्याचे बोलले जातेय.

दरम्यान, कसिनोंच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी सरकारकडून 1 कोटी रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे सरकारच्या या निधीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

राज्यातील मांडवी नदी तसेच विविध मोठ्या तारांकित हॉटेलमध्ये हे कसिनो सुरू आहेत.

गोव्यात राज्यातील ऑनलाईन कॅसिनोचा मुद्दा विधानसभेत ऐरणीवर आला होता. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव ऑनलाईन गेमिंगवर बंदीची मागणी केली.

मागील पावसाळी अधिवेशनात राज्यातील कथित दहा हजार कोटी रुपयांचा कॅसिनो घोटाळा गृह आणि वस्तू सेवा कर (जीएसटी) विभागातर्फे तपासला जाईल.

त्याचबरोबर राज्यात यापुढे एकही तरंगता (ऑफशोअर) कॅसिनो येणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bombay High Court Goa Bench Casino Order
Goa Mandovi River Casino Dispute
New Casino Vessel Permission
Mandovi River Casino PIL
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com