Death in Car Panjim Dainik Gomantak
गोवा

कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृत्यू हृदयविकाराने

पणजीत सापडलेल्या मृत व्यक्तीच्या शवचिकित्सा अहवालातून माहिती उघड

दैनिक गोमन्तक

पणजी : राजधानी पणजीत पार्किंग क्षेत्रात कारमध्ये मृतावस्थेत आढळून आलेल्या कर्नाटकातील तरुणाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले आहे. मृतदेह तसेच कार त्याच्या कुटुंबीयांकडे देण्यात आल्याची माहिती पणजीचे पोलिस निरीक्षक निखिल पालयेकर यांनी दिली.

पार्किंग केलेल्या कर्नाटकमधील कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. तिथेच सापडलेल्या वाहन चालक परवान्याच्या आधारे श्रीकांत काचगार ची ओळख पटली होती. आज सकाळी त्याचे नातेवाईक गोव्यात आल्यावर मृतदेह त्यांना दाखवण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पुन्हा पंचनामा केला. मृतदेहावर जखमा नव्हत्या. त्याला विविध आजार असल्याचे नातेवाईकांनीच पोलिसांना सांगितले. फॉरेन्सिकच्या डॉक्टरांनी केलेल्या शवचिकित्सेत त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईकांनीही हरकत न घेता सोपस्कार पूर्ण करून मृतदेह स्वीकारला, असे पालयेकर यांनी सांगितले.

दरम्यान, मृतदेहाशेजारी पोलिसांना काल औषधांचा बॉक्स सापडला होता, त्याच्या आजारासंबंधीचे केस पेपर्स कारमध्ये सापडले होते. त्यावरून पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा अंदाज व्यक्त केला होता. नातेवाईकांशी पोलिसांनी केलेल्या संपर्कातही त्याचा मृत्यू जर्जर आजाराने झाल्याची शक्यता पुढे आली होती. कर्नाटकातून आणलेली कार त्याचीच होती व ती पत्नीच्या नावावर असल्याने ती पोलिसांनी कुटुंबीयांच्या ताब्यात दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Alert: पावसाचे धूमशान! डिचोलीत रौद्रावतार, पोर्तुगीजकालीन पूल पाण्याखाली; पूरसदृश्य स्थिती

Ravichandran Ashwin: 'या' मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी अश्विनने घेतली IPL रिटायरमेंट? धक्कादायक खुलासा; बनणार पहिला भारतीय खेळाडू

ऐन चतुर्थीत दुःखाचा डोंगर! गवत कापणीसाठी गेलेल्या भावांचा मृत्य, विजेच्या झटक्याने गमावला जीव

Jammu Kashmir Gurez: LOC जवळ घुसखोरीचा डाव उधळला, 2 दहशतवादी ठार; भारतीय जवानांची धडाकेबाज कारवाई

गौरीपुत्रं विनायकम्... मुख्यमंत्र्यांच्या घरी पारंपरिक गणेशोत्सव, डॉ. सावंत यांनी केली बाप्पाची पूजा; Watch Video

SCROLL FOR NEXT