गोवा राज्यात अद्याप अॅपबेस ओला टॅक्सीची सुविधा नाही. मात्र येत्या काही दिवसात याची सुरुवात गोव्यात होणार आहे. कारण गोवा सरकार त्यासाठी सकारात्मक विचार करत आहे. अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिनो यांनी दिली. पणजी येथे आयोजित केलेल्या एका बैठकीत ते बोलत होते. (Transport Minister Mauvin Godinho say Govt positive for 'Ola' in Goa)
असे असले तरी यासाठी आवश्यक असणारे टॅक्सी आणि चालक गोव्यातील असतील का ? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. यावर उत्तर देताना मंत्री गुदिनो म्हणाले की, यासाठी आवश्यक असणारी 100 टक्के टॅक्सी आणि चालक गोव्यातीलच घेण्याची हमी 'ओला'ने दिली आहे. त्यामूळे आपण याचा सकारात्क विचार करुया. कारण पर्यटन आणि पर्यटकांच्या सुविधा यासाठी आवश्यक असल्याचं ही ते यावेळी म्हणाले.
तसेच ते म्हणाले की, राज्यात आता सर्वांगिण विकासासाठी आपण ही नवे बदल स्विकारणे आवश्यक आहे. त्यामूळे आपण हा बदल स्विकारुयात आणि हा बदल नवी संकल्पनांसह स्विकारुयात असे ते म्हणाले. तसेच आपण सर्व मिळून गोवा राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करुया, त्यासाठी आपल्याकडे काही नवी संकल्पना असतील तर त्या आमच्याशी शेअर करा आपण मिळून राज्याला पुढे घेऊन जाऊयात असे ही ते यावेळी म्हणाले. या बैठकीस राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री माविन गुदिनो यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.