माजी पंच - सरपंच लागले निवडणूकीच्या तयारीला

फोंडा तालुक्यात पंचायत निवडणूकीचे वातावरण
Gram panchayat Election
Gram panchayat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पंचायत मंत्री माविन गुदीन्हो यांनी काही दिवसांपुर्वी येत्या सहा महिन्यात निवडणूका होऊ शकतात. असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर गोव्यात आता निवडणूकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. विशेषत: फोंडा तालुक्यात पंचायत निवडणूकीचे वातावरणामूळे संभाव्य उमेदवार आणि माजी सरपंच यांनी मतरांच्या गाटीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. (Goa elections: Former Punch-Sarpanch started preparing for elections )

सध्या पंचायतीवर प्रशासकाचे राज्य सुरू झाल्यामुळे माजी पंच सरपंचाना काही काम राहिलेले नाही. त्यामुळे ते आता निवडणूकीच्या तयारीला लागलेले दिसताहेत. या तयारीत माजी संरपंचानी आपण केलेल्या विकास कामांचे गेल्या पाच वर्षात काय केले ? याचे प्रगतीपुस्तक घेऊन लोकप्रतिनिधी घरोघर फिरायला लागले आहेत.

Gram panchayat Election
‘झुआरी’च्या कामाला का होतोय विलंब?

आरक्षण निश्चित न झाल्यामुळे काहींनी आपल्या प्रभागाबरोबरच दुसऱ्या प्रभागावरही लक्ष केंद्रित करायला सुरु केले आहे. त्यामुळे त्यांचे हे दोन नावांवर पाय ठेवण्याचे प्रयत्न असल्याचे दृगोचर होत आहे. काही सरपंचानी मनमानी कारभार केला असल्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेत प्रचंड रोष असल्याचे दिसून येत असले तरी ते कोणाचे समर्थक आहेत. यावरही त्यांचे यशापयश अवलंबून असणार आहे. कुर्टी खांडेपार सारख्या पंचायतीत गेल्या पाचवर्षांत संगीत खुर्चीचा खेळ फार जोरात झाल्यामुळे अनेक लोक याबाबतीत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

Gram panchayat Election
सतर्क रहा अन्‌ भूस्खलनाचा धोका ओळखा!

अर्थात यात पंच सरपंचाएवढा त्यांना खेळविणाऱ्या त्यांच्या राजकीय गॉडफादरांचा हात असल्यामुळे या लोकप्रतिनिधींना त्याकरिता संपूर्ण दोषी ठरविता येत नाही. पण नागरिक मात्र याचा दोष पंचायत मंडळाना देताना दिसताहेत. या माजी पंच सरपंचाबरोबर अनेक इच्छूक उमेदवारही रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यांचा रोख प्रामुख्याने विद्यमान पंचायत मंडळाच्या अकार्यक्षमतेवर दिसून येत आहे. माजी पंच सरपंच हे कसे अकार्यक्षम होते आणि आपण निवडून आल्यास कसे कार्यक्षम ठरू हे पटवून देण्याचा ते प्रयत्न करताना दिसत आहेत.

अर्थात ये जो पब्लिक है ये सब जानती है या गाण्याप्रमाणे लोकही आता शहाणे झाले असून त्यांनाही अच्छा कौन और बुरा कौन याची जाण असल्याचे दिसून येत आहे. त्यात परत फोंडा तालुक्यात तरी चारही मंत्री असल्यामुळे त्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. सध्या या तालुक्यात तीन मंत्री भाजपचे असून एक मंत्री मगोचा आहे. पण मगोही सरकारात असल्यामुळे येत्या त्या पंचायत निवडणूकीत ही युती राहते की काय हे बघावे लागेल. अर्थात पटलावर युती दिसत असली तरी प्रत्यक्षात ती उतरते की काय याचेही अवलोकन करावे लागेल.

फोंडा, शिरोडा व प्रियोळ या तीन्ही मतदारसंघात मगोपचे कार्यकर्ते रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. या निवडणूका पक्षीय पातळीवर होणार नसल्या तरी त्यात मंत्री आमदार आपला हात दाखविणार यात शंकाच नाही. अर्थात पडद्यामागून काही सोंगाट्या हलू शकतात असे आताच दिसायला लागले आहे. काही विद्यमान पंचाना पराभूत करण्याकरिता रणनीती आखायलाही सुरूवात झाली आहे. फोंडा मतदारसंघातील कुर्टी खांडेपार पंचायतीत कॉग्रेस प्रणीत उमेदवार रिंगणात उतरणार यात शंकाच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com