Cm Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Government Jobs: 'भरती आयोगामुळे सरकारी नोकरीत पारदर्शकता'! 50 जण कामावरती रुजू; CM सावंतांनी दिली माहिती

Cm Pramod Sawant: आयोगाने सरकारी नोकरीच्‍या ‘क’ वर्गातील ७५२ पदांसाठी जाहिरात दिलेली असून, त्‍यात निवड झालेले ५० जण सरकारी नोकरीत रुजूही झाले आहेत, असे मुख्‍यमंत्री सावंत यांनी स्‍पष्‍ट केले.

Sameer Panditrao

पणजी: सरकारी नोकरभरती पारदर्शकपणे व्‍हावी, याच हेतूने राज्‍य सरकारने कर्मचारी भरती आयोगाची स्‍थापना केली. आयोगाकडून घेण्‍यात येणाऱ्या परीक्षांमध्‍ये पारदर्शकता असल्‍याने आणि उमेदवारांना पेपर संपताच गुण समजत असल्‍याने त्‍यांच्‍यात या परीक्षांबाबत विश्‍वास निर्माण झाला आहे. आत्तापर्यंत आयोगाने सरकारी नोकरीच्‍या ‘क’ वर्गातील ७५२ पदांसाठी जाहिरात दिलेली असून, त्‍यात निवड झालेले ५० जण सरकारी नोकरीत रुजूही झाले आहेत, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्‍पष्‍ट केले.

कर्मचारी भरती आयोगाच्‍या पाटो-पणजी येथील नव्‍या कार्यालयाच्‍या उद्‍घाटन समारंभप्रसंगी मुख्‍यमंत्री बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, आयोगाचे सदस्य नारायण सावंत, शशांक ठाकूर उपस्थित होते.

सरकारी खात्‍यांतील सर्वच रिक्त पदे कर्मचारी भरती आयोगामार्फत भरण्‍याची प्रक्रिया सरकारने गतिमान केलेली आहे. सरकारी खात्‍यांतील सर्व रिक्त पदे लवकरच आयोगामार्फत भरण्‍यात येतील, असेही मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.

जुन्‍ता हाऊसमधील कार्यालयांसाठी जागेचा शोध

पणजीतील जुन्‍ता हाऊसमधील कार्यालयांचे इतर ठिकाणी स्‍थलांतर करण्‍यासाठी जागेचा शोध घेण्‍यात येत आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच ती कार्यालये पुन्‍हा नव्‍या इमारतीत आणली जातील, असे मुख्‍यमंत्री सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT