Transgender sex racket exposed Dainik Gomantak
गोवा

Gomantak Special Report : गोव्यात वेश्‍या आणि ड्रग्ज व्यवसायामध्ये ‘बॉबी’ची दहशत; गुन्हेगारीला बळ

तृतीयपंथियांवर होतोय अत्याचार, पोलिसांकडून कारवाईची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Gomantak Special Report : इतर राज्यांतील तृतीयपंथियांना नृत्य करण्यासाठी गोव्यात आणून त्यांना वेश्‍या व्यवसाय करण्यास भाग पाडणारा तृतीयपंथीय बॉबी हा नेता बनला आहे. त्याचे न ऐकणाऱ्याला तो बाऊन्सरकरवी मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहे. हा बॉबी ड्रग्ज विक्रीमध्येही गुंतलेला आहे.

त्याच्या कचाट्यातून बाहेर पडून त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही, याची खंत आहे. त्यामुळे गोवा प्रशासन व पोलिसांनी या तृतीयपंथीय ‘बॉबी’चा भांडाफोड करण्याची मागणी काही तृतीयपंथियांनी ‘गोमन्तक टीव्ही’शी बोलताना केली.

‘तृतीयपंथीय बॉबी हा मुंबईतील असून गत 15 ते 20 वर्षांपासून तो तृतियपंथियांवर अधिराज्य गाजवत आहे. कोणीही तृतियपंथ गोव्यात आल्यास तो संपर्क साधतो व त्याला दबावाखाली ठेवतो. आम्ही सर्वजण गोव्यात डान्स करून पोट भरण्यासाठी आलो.

मात्र, हा बॉबी आम्हाला अश्‍लिलता करण्यास भाग पाडत आहे. डान्स व्यवसायातून पैसा अधिक मिळत नसल्याने त्याने काही बाऊन्सरना हाताशी धरून तृतियपंथियांना वेश्‍या व्यवसाय करण्यास जबरदस्तीने भाग पाडले जात आहे , असे त्यांनी सांगितले.

अंगावर जखमांचे व्रण

बॉबीने त्याच्याविरोधात बोलल्याने आम्हालाही मारहाण केली आहे, असे सांगत काही तृतीयपंथियांनी हातापायांवर तसेच पाठीवरील मारहाणीचे वळ दाखवले.

हा बॉबी ड्रग्ज घेतल्यावर हिंसक बनतो व अत्याचार करतो. त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पीडितांच्या व्यथा

आम्ही सर्वजण यापूर्वी काही कार्यक्रमांसाठी तसेच क्लबमध्ये डान्स करत होतो. त्यातून पोटापुरते पैसे मिळत होते. मात्र, गोव्यात स्वतःला सर्वेसर्वा समजणारा तृतीयपंथीय ‘बॉबी’ याने आम्हाला दडपणाखाली ठेवले आहे. त्याच्याप्रमाणे न वागल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आहे.

फ्लॅटमध्ये येऊनही तो कधी कधी नशेत असताना मारहाण करतो. राज्यातील किनारपट्टी परिसरात त्याने अनेक तृतीयपंथियांना वेश्‍या व्यवसाय करण्यास लावले आहे. त्यांच्याकडून तो कमिशन घेतो. दिले नाही तर गोव्यात राहण्यास देणार नाही अशी धमकी देतो.

काही पुरुषांना तो तृतीयपंथियांचा वेश करण्यास लावून पर्यटकांना लुटण्यास सांगत आहे. हे सगळे असह्य होत आहे. आमच्यापैकी अनेकजणांनी आवाज उठविला होता. मात्र, त्याने मारहाण करत त्यांना गप्प केले.

पर्यटकांना लुटण्याचे प्रकार

मिरामार येथे काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार उघडकीस आला होता. कळंगुट, बागा तसेच इतर समुद्रकिनाऱ्यावर तृतीयपंथियांकरवी पर्यटकांना लुटण्याचे प्रकार तो घडवून आणत आहे.

त्यामुळे त्याच्या या कारवाया मोडून काढाव्यात व आम्हा तृतीयपंथियांना आमचे जीवन मुक्तपणे जगण्यास संधी द्यावी, अशी मागणी या तृतीयपंथियांनी आपल्या व्यथा व्यक्त करताना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT