Mapusa News Dainik Gomantak
गोवा

कुचेलीत 2 वर्षे उलटली तरी ट्रान्सफॉर्मर बंदच! एमआरएफ प्रकल्पामधील कामकाजावर होतोय परिणाम

वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या बेलिंग मशीनच्या कामावरही परिणाम

Kavya Powar

म्हापसा येथील नगरपालिकेच्या कुचेली प्रकल्पामध्ये उभारलेला वीज ट्रान्सफॉर्मर मागील दोन वर्षांपासून चार्ज (कार्यान्वित) करणे बाकी आहे. परिणामी, एमआरएफ प्रकल्पामधील कामकाजावर परिणाम होतोय. विशेषतः परिणाम हा वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या बेलिंग मशीनच्या कामावर होताना दिसतो.

उपलब्ध माहितीनुसार, म्हापसा पालिकेने कुचेली येथील मटेरिअल रिकव्हरी फॅसिलीटीमध्ये (एमआरएफ) नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून सुमारे दोन वर्षे उलटली. मात्र, आजतागायत तो कार्यान्वित केलेला नाही, परिणामी प्रकल्पस्थळी कचरा प्रक्रिया कामावर परिणाम होत आहे.

सूत्रांनी माहिती दिली की, म्हापसा पालिकेने सदर काम घेण्यासाठी गोवा राज्य नागरी रिकास एजन्सीशी संपर्क साधला. आणि त्यानुसार २०२१मध्ये नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा कार्यादेश जारी केला. परंतु वर्षभरात विविध समस्यांमुळे हे काम पूर्ण झाले नाही.

एमआरएफ प्रकल्प हा कचर्‍यावर प्रक्रिया केल्यानंतर निर्माण होणार्‍या गॅसवर काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, कधीतरी काही अडचण आल्यास किंवा देखभालीचे काम निघाल्यास प्रक्रियेच्या कामावर परिणाम होतो.

त्यामुळे प्रकल्पामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार, म्हापसा पालिकेने जीसुडाशी संपर्क साधला व त्यांना पत्र लिहून प्रक्रिया जलद करण्याची विनंती केली आहे. जेणेकरुन, काम लवकर सुरू करता येईल व ट्रान्सफॉर्मर चार्ज करुन कार्यान्वित करता येईल.

  • ऑगस्ट २०२३मध्ये संयुक्त पाहणी केली होती. ज्यामध्ये पालिका अधिकार्‍यांच्या तांत्रिक विभागासह कंत्राटदार आणि सहाय्यक अभियंता वीजपुरवठा यांनी ही पाहणी केलेली. ज्यावेळी असे आढळले की, आर.एम.यू. स्थापित केल्याशिवाय सदर वीजट्रान्सफॉर्मर चार्ज केला जाऊ शकत नाही.

  • आर.एम.यू या युनिटसाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, तसा प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आम्ही जीसुडाकडे समस्यांचा पाठपुरावा करत आहोत. सध्या आर.एम.यू हा युनिट आला आहे आणि आता आम्ही मुख्य अभियंत्याच्या मंजुरीची वाट पाहताहोत. जेणेकरुन परवानगी मिळताच काम सुरू करुन या महिन्याच्या अखेरीस ते तयार होण्याची शक्यता आहे.

- विराज फडके, म्हापसा पालिकेचे उपनगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT