Goa News: बेती येथे अंगणात खेळणाऱ्या 5 वर्षीय मुलीचा मृत्यू...

Goa Breaking News 14 November 2023: गोव्यातील आजच्या ताज्या घडामोडी
Goa Breaking News 14 November 2023
Goa Breaking News 14 November 2023Dainik Gomantak

दुर्दैवी! अंगणात झोका खेळताना खांब अंगावर कोसळला, बेती येथे 5 वर्षीय मुलीचा मृत्यू

बेती येथे घराच्या अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय मुलीच्या अंगावर कॉन्क्रीट खांब पडून मृत्यू झाला आहे. उपचारासाठी तिला गोमेकॉत दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान तिच्या मृत्यू झाला. पर्वरी पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण नोंद केले आहे.

इफ्फी फिल्म बझार अंतर्गत प्रस्तावीत चित्रपटांची यादी जाहीर, 6 भाषांमधल्या वैविध्यपूर्ण चित्रपटांची निवड

गोव्यात होणाऱ्या 54 व्या भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बझार अंतर्गत प्रस्तावीत चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. या वर्षी निवड झालेल्या सिनेमांमध्ये कथात्मक, लघु माहितीपट, माहितीपट, भयपट आणि कथात्मक अॅनिमेशन पट असं वैविध्यपूर्ण मिश्रण आहे.

या सर्व चित्रपटांमधून भारतात आणि भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांशी संबंधीत विषय मांडले गेले आहेत.

6 वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू! चिखली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांना घेराव

वाड्डे येथील दुर्गा माता मंदिराजवळ राहणाऱ्या वाणी खानापूर या 6 वर्षीय मुलीचा डेंग्यूच्या तापाने मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) संतप्त नागरिकांनी चिखली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घेराव घातला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला.

दाबोळी विमानतळावर व्यवसाय सुरु करण्याची गोवेकरांना संधी; निविदा निघाली, आजच करा अप्लाय

दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर व्यवसाय सुरु करण्याची संधी निर्माण झाली आहे. विमानतळावर विविध दुकानांसाठी गाळे उपलब्ध असून, यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गोवेकरांसाठी व्यवसाय सुरु करण्याची ही सुवर्णसंधी असून, त्यासाठी निविदा प्रक्रियेत भाग घेता येईल.

भ्रष्ट जुमला पार्टीच्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत न्यायव्यवस्थेसारख्या संस्था धोक्यात; अमित पाटकर

भ्रष्ट जुमला पक्षाच्या गेल्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत न्यायव्यवस्थेसारख्या संस्था धोक्यात आल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मंगळवारी केला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यालयात पाटकर बोलत होते.

पंडित नेहरू हे आधुनिक भारताचे निर्माते होते, ज्यांनी देशाचा भक्कम पाया रचला, असे पाटकर म्हणाले.

गोव्यातील 'धेंडलो' परंपरा

सहकार क्षेत्रातील पदवी/पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा गोवा सरकारचा मानस. शिक्षण संचालनालय यावर काम करत असून ते 2-3 महिन्यांत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

कारेमड्डी येथे सिलेंडरचा स्फोट

कारेमड्डी कुडचडे येथील जामा मशिदजवळील इम्तिहाज सरमादी यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये किचन पूर्णपणे जळाले असून एक व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेत साडेतीन लाखांचे नुकसान झाले.

दिवाळीच्या तोंडावर गोव्यात 108 ला रस्ते अपघातांशी संबंधित 65 कॉल; सरासरीपेक्षा 30 टक्के वाढ

दिवाळीच्या तोंडावर गोव्यातील आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा ‘108’ ला रस्ते अपघातांशी संबंधित 65 कॉल प्राप्त झाले. कॉलची संख्या दैनंदिन सरासरीपेक्षा 30 टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती मंगळवारी एजन्सीने दिली.

शनिवार आणि रविवारी झालेल्या अपघातांपैकी 90 टक्के अपघात दुचाकी वाहनांचे होते, अशी माहिती राज्य सरकार संचालित रुग्णवाहिका सेवेच्या प्रवक्त्याने दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मनात गैरसमज पसरविण्यात आले!

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात मुख्यमंत्र्यांचा मला पूर्ण पाठींबा होता. पण काही जणांकडून मुख्यमंत्र्यांच्या मनात गैरसमज पसरविण्यात आला जेणे करुन मला त्यांचा पाठींबा न मिळो. मात्र माझ्यावर मुख्यमंत्र्यांनी पूर्ण विश्वास ठेवला, क्रीडा मंत्री गोविंद गावडेंचे प्रतिपादन.

Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak

गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करू शकत नाही, अशी अफवा काही राज्ये पसरवत होती. मात्र कठोर परिश्रम आणि समर्पणानंतर गोव्याने राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले. आता तीच राज्ये ऑलिम्पिक किंवा आशियाई खेळांसारखे क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल गोव्याचे कौतुक करत आहेत.. अशी माहिती गोविंद गावडे यांनी दिली.

गोव्यात साजरा होणारा गुरांचा पाडवा...

मये-वायंगिणी पंचायतीच्या सरपंचपदी विद्यानंद कारबोटकर

मये-वायंगिणी पंचायतीच्या सरपंचपदी विद्यानंद कारबोटकर. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवड. विद्यमान पंचायत मंडळाच्या कार्यकाळातील कारबोटकर तिसरे सरपंच.

विद्यानंद कारबोटकर
विद्यानंद कारबोटकरDainik Gomantak

कालवा दुरूस्तीच्या कामामुळे बार्देश तालुक्यात मर्यादीत पाणी पुरवठा

कालवा दुरूस्तीच्या कामामुळे अस्नोडा व पर्वरी जलशुध्दीकरण प्रकल्पांना तिलारी धरणातून सोडण्यात येणारा कच्च्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे हा पुरवठा पूर्वरत होई पर्यंत बार्देश तालुक्यात मर्यादीत पाणी पुरवठा असणार आहे.

सोमवारी 13 नोव्हेंबर रोजी पासून तिलारी धरण जलसिंचन विभागाकडून धरणाच्या नादुरूस्त झालेल्या कालव्यांचे दुरूस्ती काम हाती घेतले आहे. यामुळे तिलारीच्या पाण्यावर अवलंबून असणार अस्नोडा व पर्वरी जलशुध्दीकरण प्रकल्पाला कच्च्या पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे.

कदंबकडून 2 इलेक्ट्रिक बसेस सुरू

कदंब परिवहन महामंडळाने पणजी बसस्थानकापासून गोवा विद्यापीठापर्यंत बांबोळी -जीएमसी मार्गे 2 इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या आहेत.

सत्तराव्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते मयेत उद्घाटन. 'सहकार क्षेत्रातील सध्याची प्रगती' यंदाच्या सहकार सप्ताहाची संकल्पना.

गुरांना वाचवण्याच्या नादात मासळीवाहू कंटेनरचा अपघात!

 राज्यातील अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. मालपे येथे आज सकाळी एका मासळी कंटेनरचा भीषण अपघात. सदर कंटेनर केरळमध्ये रजिस्टर आहे. आज पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात घडला.

हा कंटेनर राष्ट्रीय महामार्ग 66 महाराष्ट्र रस्त्यावरून जात असताना रस्त्यात अचानक गुरे आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गुरांना वाचवण्याच्या नादात कंटेनर रस्त्याच्या एका बाजूला कलंडला.

यामध्ये कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच यामध्ये असलेल्या मासळीचेही नुकसान झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com