Goa Police Transfer News
Goa Police Transfer News Dainik Gomantak
गोवा

गोवा पोलीस दलात बदल्यांचं सत्र सुरुच

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता पोलीस दलातही बदल्यांचं सत्र सुरु झालं आहे. गोवा पोलीस दलात एकाच दिवसात मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. काल 19 पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर आज गोवा पोलीस दलातील 12 पोलीस सहनिरीक्षक, 26 हेड कॉन्स्टेबल, आणि 47 कॉन्स्टेबल यांची बदली करण्यात आली आहे. (Goa Police Transfer News)

स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नारा देत नव्याने सत्तेवर आलेल्या राज्य सरकारने विकासकामांचा धडाका लावला आहे. अशातच आता प्रशासकीय यंत्रणेमध्ये मोठे बदल झाले असून केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने आयएएस व आयपीएस विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात गोव्यातून वेगवेगळ्या राज्यांत तर ॲग्मूट केडरमधून अनेक नव्या अधिकाऱ्यांना गोव्यात पाठवण्यात आले आहे.

योगायोगाने गोव्यातून बाहेर गेलेल्या संदीप जॅकीस आणि बॉस्को जॉर्ज या गोमंतकीय अधिकाऱ्यांना परत मायभूमीत सेवा करण्याची संधी दिली आहे. जॅकीस हे प्रशासकीय अधिकारी असून जॉर्ज हे पोलिस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असताना गृह मंत्रालयाने केलेल्या या बदल्या अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरल्या असून राज्याचे प्रशासन गतिमान करण्यासाठी या बदल्या केल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यातून बदली झालेले पोलिस महानिरीक्षक राजेश कुमार यांना गोवा पोलिस सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.

गृह मंत्रालयाने ॲग्मूट केडरमधील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांंचा आदेश जारी केला आहे. त्यामध्ये पाच आयएएस दिल्लीत तर त्यांच्या जागी चारजण गोव्यात आले आहेत. आयपीएसमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची दिल्लीला बदली झाली असून दोघे गोव्यात आले आहेत. 11 नगरनियोजक आणि उपनगरनियोजकांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Ponda News : ८४ रोजंदारी कामगारांचा पगार देणार; फोंडा पालिका बैठकीत निर्णय

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये जमावाकडून 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या, दूतावासाकडे जीवाची भीक मागितली पण...

Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Goa Today's Live News: मुष्टिफंड शाळेला कारणे दाखवा नोटीस

SCROLL FOR NEXT