Transfer of 23 judges from Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 23 न्यायाधीशांच्या बदल्या

7 जिल्हा तर 16 दिवाणी न्यायाधीशांचा समावेश

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील 23 न्यायाधीशांच्या बदल्यांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व प्रशासकीय न्यायमूर्तींच्या निर्देशांनुसार रजिस्ट्रार जनरल एम. डब्ल्यू. चंदवाणी यांनी जारी केला आहे. त्यामध्ये 7 जिल्हा न्यायाधीश, 3 दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ श्रेणी) आणि 13 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ श्रेणी) यांचा समावेश आहे.

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या म्हापसा येथील न्यायाधीश पॉल शेरीन गेरतुर्दे यांची मडगाव येथे, पणजीच्या शमा जोशी यांची म्हापसा येथे, मडगावच्‍या चोलू गावस यांची पणजी येथे, मडगावच्या शर्मिला पाटील यांची म्हापसा येथे, पणजीच्या पूजा कवळेकर यांची मडगाव येथे, म्हापसा येथील बॉस्को रॉबर्टस् यांची

मडगाव येथे बदली करण्यात आली आहे. दिवाणी न्यायालय वरिष्ठ श्रेणीतील डिचोलीच्या न्यायाधीश कल्पना गावस यांची वास्को येथे, वास्कोच्या शुभदा दळवी यांची डिचोली येथे बदली करण्यात आली आहे.

दिवाणी न्यायालय कनिष्ठ श्रेणीतील मडगावच्या न्यायाधीश शाहीर इस्सानी यांची पणजी येथे, सांगेच्‍या सुनीता गावणेकर यांची पेडणे येथे, वास्कोच्यावैशाली लोटलीकर यांची सत्तरी येथे, काणकोणच्या अवदी शानूर यांची फोंडा येथे, म्हापसा येथील अनुराधा आंद्राद यांची काणकोण येथे, पणजीच्या आश्‍विनी खांडोळकर यांची म्हापसा येथे, फोंडा येथील पूजा सरदेसाई यांची मडगाव येथे, पेडणेच्या सुमन गाड यांची वास्को येथे, वाळपईच्या ज्यूड सिक्वेरा यांची वास्को येथे, वास्कोच्या पूर्वा नाईक यांची पणजी येथे, म्हापशाच्या अनुशा कायसुवकर यांची सांगे येथे तर पणजीच्या पूजा देसाई यांची म्हापसा येथे बदली करण्यात आली आहे.

म्हापसा येथील न्यायाधीश टी. मास्कारेन्हास, पणजीच्या आरतीकुमारी नाईक व शेख शबनम यांना आहेत त्‍याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT