Transmedia Conclave Goa Dainik Gomantak
गोवा

Transcend Goa 2026: ट्रान्सेंड गोवा- 26 चा बिगुल! कथानिर्मात्यांसाठी संधीचे द्वार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Transcend Goa: ट्रान्समीडियाबद्दल आपण अधिक जाणून घेऊ पाहत असाल तर पणजी येथील मॅकीनेझ पॅलेसमध्ये १५ आणि १६ जानेवारी असे दोन दिवस आयोजित होत असलेल्या ‘ट्रान्सेंड गोवा-२६’मध्ये आपण अवश्य हजेरी लावायला हवी.

गोमन्तक डिजिटल टीम

स्टो री टेलिंग’च्या जगतात ‘ट्रान्समीडिया’ महत्त्वाचे स्थान घेऊ पाहत आहे.‌ एकच कथा ही चित्रपट, ॲनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स, इमर्सिव्ह मीडिया किंवा एआय वगैरे वेगवेगळ्या माध्यमातून सादर होऊ शकते आणि विशेष म्हणजे यातील प्रत्येक माध्यम त्या कथेला वेगवेगळे परिमाण देऊ शकते. ते कथेचे रूपांतरण नसते तर कथेचा तो एक विस्तार असतो. ‘मार्वल’मधून आम्ही ते अनुभवले आहे किंवा हॅरी पॉटरचे उदाहरणही आमच्यासमोर आहे.

ट्रान्समीडियाबद्दल आपण अधिक जाणून घेऊ पाहत असाल तर पणजी येथील मॅकीनेझ पॅलेसमध्ये १५ आणि १६ जानेवारी असे दोन दिवस आयोजित होत असलेल्या ‘ट्रान्सेंड गोवा-२६’मध्ये आपण अवश्य हजेरी लावायला हवी. ट्रान्समीडिया स्टोरीटेलिंग, आयपी इनोव्हेशन आणि क्रॉस-मीडियम सर्जनशीलता यांना समर्पित असलेली ही भारतातील पहिली शिखर परिषद आहे.

भारतात निर्माण होत असलेल्या मनोरंजन, संस्कृती आणि सर्जनशील तंत्रज्ञानाच्या दीर्घकालीन विकासासाठी ही एक सुरवात असू शकते. या परिषदेमध्ये चित्रपट निर्माते, ॲनिमेटर, गेम डिझाइनर्स, कॉमिक बुक क्रिएटर्स, इमर्सिव्ह मीडिया आर्टिस्ट, तंत्रज्ञ, आयपी (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी) धोरणकर्ते आणि गुंतवणूकदार एकत्र येणार आहेत.‌ ही परिषद गोव्याला जागतिक नकाशावर स्थान देऊ शकते.

कथारचना, आयपी धोरण, एआय चलित कथा निर्मिती याविषयांवर या संमेलनात कार्यशाळा आणि मास्टर क्लास असणार आहेत. निर्माते, स्टुडिओ, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञ यामधील उच्च प्रतीच्या नेटवर्किंगचा अनुभव आपण यात घेऊ शकाल. दरम्यान, ‘ट्रान्सेंड गोवा-२६’चे आयोजन गोवा फ्यूचर प्रूफ आणि गोवा मनोरंजन संस्था यांनी केले आहे. ‘मॅकीनेझ पॅलेस’मध्ये होणाऱ्या या संमेलनात सहभाग नोंदवण्यासाठी https://transcendgoa.com या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.

१६ जानेवारी २०२६

सकाळी १०.३० ते ११.३० वा. : जपानचा ट्रान्समीडिया इतिहास

सकाळी ११.५०‌ ते दु. १२.४० वा. : कथा हेच चलन

(ब्रँड आणि फ्रेंचाईजी निर्माण करणाऱ्या प्रभावी कथा कशाप्रकारे कार्य करतात याचा मागोवा)

दु. २.२० ते ३.३० वा. : मुगाफी ट्रान्समीडियातील प्रभावी शक्ती कशी बनली?

(मुगाफीच्या इको सिस्टमचा अभ्यास. सर्जनशील समुदाय एकत्र येऊन जागतिक संधीचे दार उघडणाऱ्या कथांचा विस्तार कसा करतात यासंबंधी)

दु. ३.५० ते सायं. ४.४५ वा. : संग्रहणीय वस्तू ते संस्कृती : खेळणी ते ट्रान्समीडिया

(कथेची पोच खेळणी, संग्रहणीय वस्तू आणि परवाना धोरणांपर्यंत कशी पोहोचू शकते आणि वेगवेगळ्या माध्यमात ती मूल्य साखळी कशी निर्माण करू शकते यासंबंधी)

सायं. ५.१० ते ६ वा. : जागतिक आयपीची पुढील लाट (‘बौद्धिक संपदा’ या संबंधातले हे सत्र भारत आशिया आणि पाश्चिमात्य निर्मात्यांच्या सहयोगी प्रकल्पांबद्दल माहिती देईल.)

ट्रान्सेंड गोवा-२६’चे वेळापत्रक:

१५ जानेवारी २०२६

सकाळी ११.१० वा. : उद्‌घाटन

सकाळी ११.३० ते दु. १२.२० वा. : पडद्यापलीकडे : दूरवर पोहोचणाऱ्या कथांची निर्मिती

(चित्रपट, टेलिव्हिजन, गेम्स, सोशल मीडिया या माध्यमांसाठी प्रेक्षकांना अनुकूल असणाऱ्या आणि त्यांना गुंतवून ठेवणाऱ्या आकर्षक कथा कशा रचाव्यात यासंबंधी)

दु. १२.४० ते १.३० वा. : भारताच्या मीडिया इकोसिस्टमची उत्क्रांती

(हे एव्हीजीसी (ॲनिमेशन/व्हिडिओ इफेक्ट्स/गेमिंग/कॉमिक्स) सादरीकरण, भारतातील मीडिया इकोसिस्टम कशी विकसित झाली यासंबंधी असेल.)

दु. २.३० ते ३.१५ वा. : भारताचे मूळ आयपी पॉवर हाऊस : राज/अप्ला कॉमिक्स

(स्थानिक प्रकाशकांनी भारतीय सुपर हिरो कथा ट्रान्समीडियामध्ये कशा रूपांतरित केल्या याबद्दल)

दु. ३.३५ ते सायं. ४.२५ वा. : मल्टिप्लॅटफॉर्म कथा निर्माण करण्याची कला (प्रसिद्ध निर्मात्यांचा समावेश असलेले हे सत्र अनेक प्लॅटफॉर्मवर सादर होऊ शकणाऱ्या कथेची रचना कशी करावी याबद्दल आहे.)

सायं. ४.३० ते ५.१५ वा. : ए.आर. रहमानचा ‘सिक्रेट माउंटन’ : ट्रान्समीडिया संगीताची निर्मिती (ए.आर. रहमान यांचा नवीन प्रकल्प ‘सिक्रेट माउंटन’मागची कथा)

सायं. ५.३५ ते ६.३५ वा. : ॲनिमेशनचे यश : ग्रीन गोल्ड एन्टरटेन्मेंटचा प्रवास

(भारतातील सर्वात यशस्वी ॲनिमेशन स्टुडिओ स्थापन करणारे राजीव चिलका आणि त्यांची यशोगाथा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI: विराट कोहलीचा राजकोटमध्ये धमाका! सचिन तेंडुलकरचा मोडला 17 वर्षांचा रेकॉर्ड; न्यूझीलंडविरुद्ध बनला भारताचा 'रनमशीन' VIDEO

Goa Assembly Session: मंत्रिमंडळ निर्णयांच्या गोपनीयतेवरून विधानसभेत रणकंदन; 16 जानेवारीला चर्चेची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Crime News: प्रेम, धोका अन् टोकाचं पाऊल! 21 वर्षीय एअर होस्टेसनं संपवलं जीवन; लग्नाचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Winter Session 2026: गोव्याची हवा विषारी झाली! पणजी, पर्वरीसह प्रमुख शहरांत प्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी; हवेच्या गुणवत्तेवरुन युरींचा सरकारला जाब

ICC Rankings: किंग कोहलीचं 'विराट' पुनरागमन! 1403 दिवसांनंतर पुन्हा बनला जगातील नंबर 1 फलंदाज; हिटमॅनला फटका

SCROLL FOR NEXT