Janardan Bhandari Dainik Gomantak
गोवा

Canacona Railway Station: काणकोण येथे रेल्वेगाड्या थांबत नसल्याने स्थानिकांची अडचण

खा. फ्रान्सिस सार्दिन यांनी प्रश्न सोडवावा, प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जर्नादन भंडारी यांचे निवेदन

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona Railway Station: काणकोण रेल्वेस्थानकावर रेल्वे गाड्या थांबत नसल्याच्या मुद्यावरून गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी जर्नादन भंडारी यांनी काँग्रेस नेते आणि दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना निवेदन दिले आहे. या मुद्याबाबत लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती निवेदनातून केली आहे.

काणकोण येथील नागरिकांना केरळ किंवा देशाच्या इतर भागात रेल्वेप्रवास करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. काणकोणच्या नागरिकांना हे खर्चिक तर आहेच पण अडचणीचेही ठरते. वेळही जातो. त्यामुळे या प्रश्नात लक्ष घालून त्यावर मार्ग काढावा, असे भंडारी यांनी निवेदनात म्हटले आहे. हवे तर त्यासाठी कोकण रेल्वेच्या जबाबदार अधिकाऱ्यांसमवेत शक्य तितक्या लवकर चर्चा करावी, संवाद साधावा, असेही भंडारी यांनी निवेदनात म्हटले आहे.

काणकोणवासीयांमधून यापुर्वीही अनेकदा या मुद्यावरून आवाज उठवला गेला आहे. येथील स्थानकावर रेल्वे थांबत नसल्याने स्थानिकांना वेळ आणि पैसे खर्च करावे लागतात. येथे रेल्वे थांबल्यास स्थानिकांना ते सोयीचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT