60 teachers  Dainik Gomantak
गोवा

IISC Training : ‘आयआयएससी’ मार्फत प्रशिक्षण ; 60 अध्यापकांची तुकडी कर्नाटकात

यावेळी राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, प्रो. विठ्ठल तिळवी, डॉ. महेश माजिक आदी मान्यवर उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

IISC Training : पणजी, राज्यातील ६० माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा समावेश असलेली पहिली तुकडी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सकडून प्रशिक्षण घेण्यासाठी पर्वरी येथून चल्लाकेअर-कर्नाटक येथे रवाना झाली.

यावेळी राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, प्रो. विठ्ठल तिळवी, डॉ. महेश माजिक आदी मान्यवर उपस्थित होते.

हे प्रशिक्षण विज्ञान शाखेतील शिक्षकांसाठी असून यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आदी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा समावेश आहे‌. हे प्रशिक्षण १६ दिवसांसाठी असून पूर्णवेळ आहे.

राज्यातील शिक्षकांच्या अध्यापनात नाविन्यपूर्णता आणि वैविध्यता येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा राज्य उच्च शिक्षण मंडळाच्या पुढाकारातून करण्यात आलेले आहे.

संकल्पना आधारित प्रयोगशाळा प्रशिक्षण या विषयांतर्गत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २६ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा प्रशिक्षणाचा कालावधी आहे.

‘आयआयएससी’ बरोबर करार

आयआयएससी हे देशातील पहिल्या क्रमांकाचे इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरून निवड केली जाते. परंतु गोवा सरकार, उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा राज्य उच्च शिक्षण मंडळ यांनी आयआयएससी बरोबर करार केल्याने हे प्रशिक्षण दिले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या धोरणाची पूर्ती

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे गोव्याला नॉलेज हब बनविणे हे मुख्य ध्येय आणि धोरण आहे. त्यांच्या या धोरणाच्या पूर्तीचा एक भाग म्हणजे हा प्रशिक्षण कार्यक्रम होय. या प्रशिक्षणातून तयार झालेल्या शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थी आणि शिक्षकांना होणार आहे.

असे आहेत प्रशिक्षणाचे फायदे

१ प्रशिक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांची प्रशिक्षणपूर्व चाचणी आणि प्रशिक्षणानंतर चाचणी होणार आहे. त्यातून शिक्षकांच्या अध्यापन प्रक्रियेत अद्भुत बदल घडवून आणले जाणार आहेत.

२ आयआयएससीने ३०० संकल्पनात्मक प्रयोग तयार केलेले आहेत, त्याचा अध्यापनासाठी वापर कसा करावा याचे ज्ञान मिळणार आहे.

३आयआयएससीमधील सध्या कार्यरत असलेले नामवंत तज्ज्ञ आणि माजी तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT