Goa Kokan Railway Canva
गोवा

Kokan Railway: रेल्वेचे वेळापत्रक रुळावर; वाहतूक मात्र विस्कळीतच

Kokan Railway Timetable: कारवार परिसरात दरड कोसळण्याची घटना घडल्याने रस्त्यावरील दळणवळण कित्येक तास रखडून पडले

गोमन्तक डिजिटल टीम

रत्नागिरी परिसरात दरड कोसळून माती कोकण रेल्वेमार्गावर आल्याने दोन दिवस विस्कळीत झालेले रेल्‍वेचे वेळापत्रक आज रुळावर आले. मात्र, कारवार परिसरात दरड कोसळण्याची घटना घडल्याने रस्त्यावरील दळणवळण कित्येक तास रखडून पडले.

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून सर्व वाहतूक सुरळीत झाली होती. आज सर्व रेलगाड्या पूर्ण क्षमतेने सुरू होत्या. दरम्यान, अंकोला-शिरूर या मार्गावर आज दरड कोसळल्याने गोवा-कर्नाटक यादरम्यानची रस्त्यावरील वाहतूक खोळंबून पडली होती. दुपारी ही दरड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.

कारवार पासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर चेंडिये-होसाळी येथे पाणी रस्त्यावर आल्याने हजारो वाहने काल रात्रीपासून गोवा मेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अडकून पडली. पण सायंकाळी पाणी ओसरू लागल्यावर हा मार्गही खुला झाला.

पारोडा रस्‍ता अजूनही पाण्‍याखालीच

गोव्यात पारोडा येथील रस्ता आजही पाण्याखाली असल्याने मडगाव-कुडचडे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीतच राहिली. ही वाहतूक आजही चांदर-असोल्डा मार्गेच सुरू होती. मात्र संध्याकाळी पाणी ओसरू लागल्यावर हा रस्ता चारचाकी वाहनांना खुला झाला. मडगाव येथील तळेबांध रस्ताही पाण्याखाली गेल्याने दामोदर महाविद्यालय परिसर पाण्याने भरून गेला होता. पण सायंकाळी पावसाने उसंत घेतल्याने हे पाणी खाली उतरू लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT