Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गोव्यात नववर्ष साजरा करायला आले होते, अपघातात 2 वर्षांच्या मुलीला गमावलं; पेट्रोल पंपावर मनसून्न करणारी घटना

Vasco Fatal Accident: नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आलेल्या तामिळनाडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Pramod Yadav

Vasco Fatal Accident

वास्को: वर्षाच्या पहिल्याच दिवशी (०१ जानेवारी २०२५) गोव्यात अपघाताची घटना उघडकीस आली आहे. वास्कोत पेट्रोल पंपावर झालेल्या दुचाकी दुर्घटनेत दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुटुंब गोव्यात पर्यटनासाठी आले असता त्यांच्यावर हा बाका प्रसंग ओढवल्याने शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील एक कुटुंब गोव्यात पर्यटनासाठी आले होते. फिरण्यासाठी त्यांनी रेंट अ बाईक बुक केली होती. दरम्यान, बाईकमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी ते पेट्रोल पंपावर गेले असता दुचाकी कलंडली आणि यात दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान, नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

२०२४ मध्ये २७६ जणांचा अपघाती मृत्‍यू

२०२४ या वर्षात गोव्यात २७६ जणांचा अपघाती मृत्‍यू झाला आहे. गेल्या वर्षी १ जानेवारी ते २९ डिसेंबर या काळात राज्‍यात दरदिवशी सात ते आठ अपघात व दर आठवड्याला पाच ते सहा बळी गेले आहेत. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गोव्यात २०२४ मध्ये २६५२ अपघातांची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT