Mumbai Tourist Died In Goa Dainik Gomantak
गोवा

मित्रांसोबतची मुंबई - गोवा ट्रीप ठरली अखेरची; ट्रेकिंगनंतर 23 वर्षीय तरुणाचा बीचवर मृत्यू

Goa News: मित्रांनी त्याला तात्काळ बाळ्ळी येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, येथील डॉक्टरांना त्याला मृत घोषित केले.

Pramod Yadav

कुंकळ्ळी: ट्रेकिंगनंतर मुंबईतील पर्यटकाचा बटरफ्लाय बीचवर मृत्यू झाल्याची घटना रविवारी (०८ डिसेंबर) उघडकीस आली. ट्रेकिंग करुन माघारी आल्यानंतर तरुणाला अत्यवस्थ वाटू लागले दरम्यान, थोड्याच वेळात त्याला उलटीसह विविध त्रास होऊ लागला. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. तरुण मित्रांसोबत गोव्यात पर्यटनासाठी आला असता ही घटना घडली.

मिराल गाला (वय. २३, रा. मुंबई) असे या दुर्घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिराल पाच मित्रांसोबत ०५ डिसेंबर रोजी गोव्यात पर्यटनासाठी आला होता. त्यांनी वार्का येथे मुक्काम केला होता.

०८ डिसेंबर रोजी त्यांनी बटरफ्लाय बीच येथे ट्रेकिंगला जाण्याचा निर्णय घेतला. ट्रेकिंगवरुन माघारी आल्यानंतर मिरालला त्रास होऊ लागला. अत्यवस्थ वाटत असल्याने त्याने पाणी घेतले. पण, नंतर त्याला उलट्या झाल्या व तो खाली कोसळला. सोबतच्या मित्रांनी त्याला तात्काळ बाळ्ळी येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, येथील डॉक्टरांना त्याला मृत घोषित केले.

शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, मिराल गाला याच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याने रक्तप्रवाहास अढथळा निर्माण झाला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अहवालातून देण्यात आली आहे. कुंकळ्ळी पोलिसांत याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT