Tragic Death Dainik Gomantak
गोवा

Tragic Death: संसर्गामुळे हृदय, श्वसनक्रिया पडली बंद; मडगावात 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Margao Goa News: मृत अरसिफ याची आई राबिया खान यांची चौकशी केली असता, त्यांनी मुलगा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगितले.

Pramod Yadav

मडगाव: संसर्गामुळे हृदय, श्वसनक्रिया बंद पडल्याने माडेल येथील १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. गेल्या चार दिवसांपासून त्याला ताप येत होता, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

अरसिफ खान (१४) असे मृत्यू झालेल्या १४ वर्षीय मुलाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नव्हती, सातत्याने ताप येत असल्याने तो अशक्त झाला होता. दरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी पहाटे तब्येत फारच बिघडली आणि त्याला उलट्या होऊ लागल्या. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, उपचार सुरु करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

फातोर्डा पोलिसांनी याप्रकरणी मृत अरसिफ याची आई राबिया खान यांची चौकशी केली असता, त्यांनी मुलगा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगितले. त्याला सातत्याने ताप येत होता आणि उलट्याही झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संसर्गामुळे हृदय  आणि श्वसनक्रिया बंद पडल्यामुळे अरसिफचा मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले! दोन मुली, 12 वर्षांचा मुलगा आणि आई-वडिलांचा मृत्यू; परिसर हादरला, घटनेमागचं कारण काय?

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

SCROLL FOR NEXT