Kindal Tree fell on the shed  Dainik Gomantak
गोवा

Goa News : बेतकीत माय-लेकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

ग्रामस्थांबरोबरच नातेवाईकांकडून सांत्वन

दैनिक गोमन्तक डिजिटल

रविवारी (ता.११) किंदळाचे झाड पडून बेतकी येथे माय-लेकाचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्यावर बेतकी येथील स्मशानभूमीत सोमवारी (ता.१२) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी सकाळपासूनच माय-लेकाच्या मृतदेहांची ग्रामस्थ वाट पहात होते. गोमेकॉतून शवचिकित्सा केल्यानंतर दोघांचे मृतदेह बेतकीला आणण्यात आले. ग्रामस्थ, पंचमंडळ, नातेवाईकांसह मंत्री गोविंद गावडे यांनीही अंत्यदर्शन घेतले आणि त्या परिवाराचे सांत्वन केले.

रविवारी बेतकी येथे अंजली व तिचा पुत्र भावेश घराशेजारील शेडमध्ये गरम पाणी आणण्यासाठी गेले असता, त्याचवेळी किंदळाचे झाड शेडवर कोसळले, त्यात दोघांचा अंत झाला. त्यांचा मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला होता. सोमवारी दुपारी बेतकी येथे अंजली यांचे पती अमित यांनी दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कारप्रसंगी सर्व विधी पूर्ण केल्या. गावात शोककळा पसरली होती.

पावसाळ्यात खबरदारी घ्या...

  1. वादळवाऱ्यात, मुसळधार पावासात झाडे, वीजखांब पडण्याचे प्रकार घडतात. त्याकडे लक्ष दिले पाहिजे.

  2. पावसापासून बचावासाठी झाडाखाली गाडीसह काहीजण थांबतात, तेव्हाही त्या झाडांच्या मजबुतीकडे लक्ष द्या.

  3. वीजतारांवर पडणाऱ्या झाडांबाबत वीज खाते, पंचायतीला कल्पना द्या.

  4. ओढे, नदी, नाले परिसरातून प्रवास करताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घ्यावा.

  5. बागायतीत, डोंगराळ भागात, तसेच रस्त्यांच्या कडांकडेही लक्ष द्या. पावसात त्या कोसळण्याची शक्यता असते.

  6. वादळी वारा, पावसात वीजतारा तुटण्याची शक्यता असते, अशा वेळी प्रवास करताना लक्ष द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT