Goa Traffic Cell File Photo
गोवा

Goa Traffic Police: वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; एका दिवसात तब्बल 10 लाखांहून अधिक दंड वसूली

शुक्रवारी गोवा पोलिसांनी राज्यभरात सुमारे 2,000 वाहतूक उल्लंघनांवर गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

Goa Traffic Police: गोव्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गोवा वाहतूक पोलीस आणि सरकार अधिकच सतर्क झाले आहे. जास्त करून अपघात हे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानेच होतात हे निदर्शनास आल्यावर वाहतूक पोलीस विभाग अॅक्शन मोडमध्ये आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत दंड आकारण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी गोवा पोलिसांनी राज्यभरात सुमारे 2,000 वाहतूक उल्लंघनांवर गुन्हा दाखल करून केवळ एका दिवसात 10 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला. यावेळी डेप्युटी एसपी सिद्धांत शिरोडकर म्हणाले की, गेल्या वर्षी याच दिवशी वाहतूक पोलिसांनी अवघे दोन लाख रुपये जमा केले होते.

गेल्या काही दिवसांपासून वाहतूक शाखेकडून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबवली जात आहे. शिरोडकर म्हणाले की, ही वाहतूक कारवाई करण्यामागे रस्त्यावरील जीवितहानी कमी करणे हाच उद्देश आहे. पेडणे, कळंगुट, पर्वरी आणि मोपा येथील ट्रॅफिक विभागाने उत्तर गोव्यात वाहतूक उल्लंघनाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली आहेत, तर दक्षिण गोव्यात, मडगाव वाहतूक विभागातर्फे सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपला सनातन धर्माची पर्वा व आदर नाही, प्रदेशाध्यक्ष दामूंच्या वाढदिवशी मंदिरात केक कापणे 'अधर्म', काँग्रेसचा हल्लाबोल

Devarai: ..काही कोटी वर्षांपूर्वीचे, भारतात चारच ठिकाणी असणारे वृक्ष; गोव्यातील देवराया आणि त्यांचे महत्व

प्रेषित मुहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, गोव्यात मुस्लिम समाज आक्रमक; कारवाई करण्याची मागणी

Kshatriya Migration: काठियावाडी क्षत्रिय समुद्रमार्गे आले, ते झुआरी नदीकाठी किनाऱ्यावरच्या खेड्यांत वसले; स्थलांतरणाचा इतिहास

Goa Slums: सामान्य गोवेकर घर घेण्यासाठी राबतोय, अतिक्रमण करणाऱ्यांना मात्र ‘अभय’ मिळतंय; झोपडपट्ट्यांचे कुरूप राजकारण

SCROLL FOR NEXT