Kali River New Bridge Dainik Gomantak
गोवा

Kali River Bridge: ‘काळी’वरील नव्या पुलावरून प्रवासी बसेसची वाहतूक सुरू

Mangalore Margao Road: या नव्या पुलावरून वाहने सोडण्यासाठी कारवार जिल्ह्याच्या उपआयुक्त प्रिया लक्ष्मी के. यांनी परवानगी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: मडगाव-मंगळुरूला जोडणारा दुवा असलेला काळी नदीवरील जुना पूल मंगळवारी कोसळल्यानंतर नवीन पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. बुधवारी उशिरा या नव्या पुलावरून दुचाकी व चारचाकी वाहने सोडण्यासाठी कारवार जिल्ह्याच्या उपआयुक्त प्रिया लक्ष्मी के. यांनी परवानगी दिली. मात्र, आज काही प्रवासी बसगाड्या पुलावरून सोडण्यात आल्या.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी तातडीने काल नव्या पुलाच्या मजबुतीसंदर्भात पाहणी केली. ४१ वर्षे जुने पूल कोसळण्याची कारणे शोधण्यात येत आहेत. मात्र, मडगाव-कारवार या मार्गावरील प्रवासी बसगाड्या सदाशिवगड येथे थांबवून परतीच्या प्रवासासाठी येतात.

उत्तर कन्नडा व कारवार येथील प्रवाशांना गोव्याचा प्रवास करण्यासाठी कोडीबाग येथून नव्या काळी पुलाच्या पदपथावरून चालत सदाशिवगड येथे यावे लागत आहे. त्यानंतर सदाशिवगड येथे कदंब बसने गोव्याचा प्रवास करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT