Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Traffic Police :मद्यपान करून वाहन चालवण्‍याची कुडचडे परिसरात यंदा 86 प्रकरणे

Traffic Police : जर नियमांचे पालन केलेच नाही तर त्‍यांच्‍यावर कारवाईही होऊ शकते. वाहतूक नियमांचे उल्‍लंघन हा गंभीर गुन्‍हा आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Traffic Police : केपे, कुडचडे परिसरात मद्यपान करून वाहन चालविण्‍याची यावर्षी नोव्‍हेंबरपर्यंत ८६ प्रकरणे नोंद झाली आहेत. मात्र मागील वर्षापेक्षा ती १२ टक्‍क्‍यांनी कमी आहेत. मध्‍यमवर्गीय तसेच युवकांचा त्‍यात जास्‍त सहभाग असतो, अशी माहिती कुडचडे वाहतूक खात्‍याकडून उपलब्‍ध झाली आहे.

अशा प्रकारांना आळा घालण्‍यासाठी विशेष मोहीम रात्रीच्‍या वेळी पोलिसांकडून राबविली जाते. वाहतूक नियमांचे पालन केले तर असे प्रकार टाळता येतील. जर नियमांचे पालन केलेच नाही तर त्‍यांच्‍यावर कारवाईही होऊ शकते. वाहतूक नियमांचे उल्‍लंघन हा गंभीर गुन्‍हा आहे. दारू पिऊन वाहन चालवणे हा तर जीवघेणा प्रकार ठरू लागला आहे.

२०२० मध्‍ये मद्यमान पिऊन वाहन चालविण्‍याचे १६६० गुन्‍हे दाखल झाले होते. २०२१ मध्‍ये ही संख्‍या २६६ पर्यंत कमी झाली. यावर्षी जुलै अखेरपर्यंत पोलिसांनी जवळपास एक हजार खटले दाखल केले होते.

यंदा नोव्‍हेंबरपर्यंत कुडचडे परिसरात मद्यपान करून वाहन चालविण्‍याची ८६ प्रकरणे नोंद झालेली आहेत. चालू डिसेंबर महिन्‍यात १२ प्रकरणे नोंद झाली आहेत. २०२२ मध्‍ये ९८ प्रकरणे नोंद झाली होती.

- विजयनाथ कवळेकर, वाहतूक निरीक्षक (कुडचडे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT