Goa Traffic Police  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: उपद्रवी कारगाड्यांवर पोलिसांची कारवाई; रहिवाशांच्या तक्रारीची दखल

Mangor Hill: काही कारचालकांचा आरडाओरडाही तेथील रहिवाशांना डोकेदुखी ठरला होता

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: अंतर्गत रस्त्यावर दुतर्फा कारगाड्या उभ्या करणे, तेथेच मद्यपान करणे, लघुशंका करणे वगैरे गोष्टींना वैतागलेल्या मांगोरहिल स्पोर्ट्स क्लब परिसरातील नागरिकांनी तक्रार केली आहे. त्यांना वास्को वाहतूक पोलिसांनी साथ देऊन संबंधित कारमालकांना दंड ठोठावला आणि हा हा म्हणता तो रस्ता मोकळा झाला.

कार उभी करण्यासाठी घरांसमोर जागा नाही, मग ती अंतर्गत रस्त्यावर बिनधास्तपणे उभी करा अशी भावना झालेल्यांना वाहतूक पोलिसांची ही कारवाई म्हणजे चपराक ठरली आहे. मात्र, एका ठिकाणचा रस्ता मोकळा झाला. इतर अंतर्गत रस्त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे इतर अंतर्गत रस्तेही चर्चेत आले आहेत.

मांगोरहील स्पोर्ट्स क्लब जवळच्या रस्त्याचा वापर त्या परिसरातील रहिवाशी करतात, परंतु गेल्या काही वर्षांपासून त्या रस्त्यावर दुतर्फा कारगाड्या उभ्या करण्यात येत आहेत. अलीकडे तर त्या कारच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. एवढेच नव्हे, तर काही वेळा काही कारचालक आपल्या कारच्या बॉनेटवर मद्याच्या बाटल्या ठेऊन तेथेच मद्यपान करीत होते.

त्यांना त्यांच्या सवंगड्यांची साथ लाभत होती. मद्यप्राशन केल्यावर लघुशंकाही तेथेच करण्यात येत असे. त्यामुळे त्या रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलांना अवघडल्यासारखे होत असे. काही कारचालकांचा आरडाओरडाही तेथील रहिवाशांना डोकेदुखी ठरला होता. काहीवेळा या कारगाड्या मुख्य रस्त्यापर्यंत उभ्या करण्यात येत असल्याने तेथे अपघात झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT