डिचोली शहरात वाहतूक कोंडी  Dainik Gomantak
गोवा

डिचोली शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच

डिचोलीत बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस होतोय अडथळा

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोली (Bicholim) शहरात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले असून, 'ट्रॅफिक जाम' (Traffic Jam) होण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. शहरातील वाहतूक समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाई (Goa Police) अधिक कडक करावी. अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, साप्ताहिक बाजाराच्या दिवशी रात्री बाजारातील रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने बराचवेळ वाहने अडकून पडली होती. तर दुसऱ्या बाजूने बंदी असूनही बगलमार्गावर अवजड वाहने पार्क करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे.

डिचोली शहरातील ठराविक भागात अधूनमधून वाहतूक कोंडी होत असली, तरी विशेष करून बाजारातील रस्ता आणि सोनारपेठ-पाजवाडा रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. शहरातील कदंब बसस्थानकाकडून बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर तर वाहतूक कोंडीचे प्रकार सर्रासपणे अनुभवायला मिळते. विशेष करून साप्ताहीक बाजाराच्या दिवशी तर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनते. या रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने पार्क करून ठेवण्यात येत असल्याने ही समस्या उद्भवत असते. मध्यंतरी वाहतूक पोलिस विभागातर्फे बेशिस्त पार्किंग विरोधात दांडात्मक कारवाई हाती घेतल्यानंतर वाहतूक बेशिस्त पार्किंगचे प्रकार बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा बेशिस्त पार्किंगच्या समस्येने डोके वर काढले आहे.

बंदी क्षेत्रात पार्किंग

बसस्थानक ते शिवाजी महाराज सर्कल पर्यंतचा बगलमार्ग 'नो पार्किंग' क्षेत्र म्हणून अधिसूचित केला आहे. या बगलमार्गावर वाहने पार्किंग करण्यास बंदी आहे. तरीदेखील या बगलमार्गावर वाहने पार्क करण्यात येतात. रात्रीच्यावेळी तर हमखास या बगलमार्गावर अवजड वाहने उभी असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

SCROLL FOR NEXT