फातोर्डा : मडगाव शहर परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली असून, सुनियोजित पार्किंग नसल्याने शहतातील अंतर्गत रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहने अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत. यावर तोडगा केव्हा निघणार, याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. (Traffic jams are common in Margao Goa)
मडगाव शहरातील ओल्ड मासळी मार्केट येथे होणाऱ्या पार्किंग प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे. या ठिकाणी पार्किंग प्रकल्प बांधण्याचे नगरपालिकेने पाच-सहा वर्षांपूर्वी योजले होते. मात्र अजूनही त्याच्या कामाला सुरुवातही करण्यात आलेली नाही. याबाबत स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हे कित्येक वर्षांपासून सुरू असून, त्यावर स्थानिक प्रशासन, नगरपालिका, सत्ताधारी नेते व राज्य सरकार तोडगा काढण्यात अपयशी ठरले असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
मोक्याच्या ठिकाणी पार्किंग
मडगाव परिसरात इतर ठिकाणाहून वाहने दाखल होत असताना शहरातील मोक्याच्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत असल्याने सडेकर लेन, कारो कॉर्नर, नगरपालिका चौक, गांधी मार्केट, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड स्टेशन रोडसह इतर ठिकाणी सर्रास वाहतुकीची कोंडी होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.