पत्नीच्या खुनाला जबाबदार धरून संशयित पतीला बिहार येथे अटक

19 एप्रिलला गुळे येथे एका झाडीत सडलेल्या अवस्थेत एका बिगर गोमंतकीय महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.
Suspected husband arrested in Bihar for wife's murder
Suspected husband arrested in Bihar for wife's murderDainik Gomantak

काणकोण : गुळे येथे 19 एप्रिल रोजी झालेल्या पत्नीच्या खुनाला जबाबदार धरून संशयित पतीला काणकोण पोलिसांनी बिहार येथे ताब्यात घेतले आहे. खून झाल्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी काणकोण पोलिसांनी खुनाचे धागेदोरे एकत्र करून संशयित पती अजय मलिक याचा शोध जारी केला होता. (Suspected husband arrested in Bihar for wife's murder)

Suspected husband arrested in Bihar for wife's murder
गोमंतकीय युवकांनी उद्योग सुरू करावेत

19 एप्रिलला गुळे येथे एका झाडीत सडलेल्या अवस्थेत एका बिगर गोमंतकीय महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्या महिलेची ओळख पटत नव्हती. त्यावेळी मालभाट-मडगाव येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या सविता देवी (वय 42) 17 एप्रिलपासून बेपत्ता असल्याची तक्रार मडगाव पोलिस स्थानकात नोंदविण्यात आली होती. तोच धागा पकडून काणकोण पोलिसांनी तपास सुरू केला होता.

Suspected husband arrested in Bihar for wife's murder
'बुद्धिबळात भारताचे प्रतिनिधित्व करायला आवडेल'

19 एप्रिलला सविता देवीला घेऊन अजय मलिक (45) बाजारहाट करण्याचे निमित्त करून कदंब बसने काणकोणला घेऊन आला होता. करमलघाटात आगोंद येथे जाणऱ्या रस्त्यावर ते दोघे बसमधून उतरले होते. तिचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला, हे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले होते. त्या दिवसापासून अजय मलिक बेपत्ता होता. तो मूळचा बिहारचा असल्याने एक उपनिरीक्षक व पोलिस असे पथक त्याच्या शोधार्थ बिहारला गेले होते. पोलिसांनी सापळा रचून तब्बल एका महिन्याच्या कालावधीत त्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिस त्याला घेऊन काणकोणात येणार आहेत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com