Traffic jam in Karmalghat due to mineral transportation Dainik Gomantak
गोवा

खनिज वाहतुकीमुळे करमलघाटात लागल्या वाहनांच्या रांगा

कारवार मडगाव हमरस्त्यावरील खनिज वाहतूक रात्रीच्या वेळी करा

दैनिक गोमन्तक

काणकोण: कारवार मडगाव हमरस्त्यावरील खनिज वाहतूक रात्रीच्या वेळी करा अशी मागणी करण्यात आली आहे. बेल्लारी कर्नाटक मधून कारवार मडगाव हमरस्तामार्गे होणारी खनिज वाहतूक रात्रीच्या वेळी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दिवसा ही वाहतूक सुरू असल्याने खनिज वाहतूक वाहनाच्या रांगा हमरस्त्यावर लागत असतात. त्यामुळे अपघाता बरोबरच वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यासाठी खनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना संध्याकाळी आठ ते सकाळी सात वाजेपर्यत वाहतूक करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पैंगीणचे एक व्यापारी जयप्रकाश पैंगीणकर यांनी केली आहे. पोळे तपासणी नाक्यावर या खनिज वाहतूक वाहनांचे नियंत्रण करावे व अन्य जिवनाश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्या वाहनाना सोडावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे. या खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अरूंद अशा रस्त्यावर नेहमी वाहतूकीची कोंडी होते.

त्याशिवाय या अरूंद रस्त्यावर पोर्तूगीजकालीन कांही साकव पूल आहेत. त्यापैकी काही पूलांना समांतर दुसरे पूल उभारण्याची प्रक्रिया गेली चार वर्षे रेंगाळत आहे. सरकार पणजी ते पोळे पर्यतचा रस्ता 2022 सालापर्यत पूर्ण करण्याची घोषणा करत आहे मात्र अद्याप बाळ्ळी ते चाररस्त्याच्या कामाला अद्याप सुरूवात झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT