Traffic In St. Inez Dainik Gomantak
गोवा

Traffic In St. Inez: सांतिनेजमध्ये ‘वाहतूक कोंडी’तूर्त नित्याचीच, रस्ते खोदकामामुळे मार्ग तोकडा

Traffic In St. Inez: स्मार्ट सिटीची कामे वेगवेगळी सरकारी खाते करीत आहेत, परंतु ‘आयपीएससीडीएल’कडेच सर्व बोट दाखवले जात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Traffic In St. Inez

सांतिनेजमधील विवांता चौकात ‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे रस्ता खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे आल्तिनोकडून कलाअकादमीकडे जाणाऱ्या आणि स्टेट बँकेकडून कला अकादमीकडे येणाऱ्या व कलाअकादमीकडून सांतिनेजकडे जाणाऱ्या वाहनांसाठीचा मार्ग तोकडा झाला आहे.

परिणामी चौकात वाहतूक कोंडीचे प्रकार घडू लागले असून, रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत अशी वाहतूक कोंडी सहन करावी लागणार आहे.

स्मार्ट सिटीची पणजीत एकावेळी ठिकठिकाणी कामे सुरू आहेत, त्याचा फटका नागरिकांना होत आहे. कामे सुरू झाल्याने स्थानिकांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार असल्याचे भाकीत यापूर्वीच इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिग्स यांनी केले आहे.

स्मार्ट सिटीची कामे वेगवेगळी सरकारी खाते करीत आहेत, परंतु ‘आयपीएससीडीएल’कडेच सर्व बोट दाखवले जात आहेत.

मळावासीयांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

मळावासीयांना वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्वत्र रस्त्याची कामे सुरू असल्याने वाहन असूनही वापर करता येत नाही. तर पार्किंगला जागा शोधावी लागत आहे. रुग्णवाहिका पोहोचेल का,अशीही भीती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT