Panaji Smart City: पणजीवासीयांच्या डोळ्यात ‘धूळफेक’च! वाहनचालकांची गोची

Panaji Smart City: ‘स्मार्ट सिटी’त अनागोंदी दिसू नये म्हणून धडपड, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे चारचाकी वाहनधारकांना नियोजित मार्गानेच येजा करावी लागत आहे.
Panaji Smart City
Panaji Smart CityDainik Gomantak

Panaji Smart City

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी काल पणजीत ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. लोकांना काय त्रास होत होतोय, हे त्यांनी स्वतः पणजी फिरून पाहिले, नागरिकांच्या कथा-व्यथा ऐकल्या... न्यायाधीश कामाची पाहणी करणार आहेत. त्यांना धूळ दिसू नये, यासाठी काम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी मारण्याची घाई केली.

पण ‘पीडब्ल्यूडी’ कार्यालयासमोरच टॅंकरची चाके रूतली नंतर महत्प्रयासाने गाडी हलवली. आज काही मोजक्याच कामाच्या ठिकाणी पाणी मारून लोकांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचे दिसून आले.

वारंवार वाहने रुतण्याच्या घटनांमुळे कामातील अनागोंदी दिसून आली. पणजीतील कामे कशापद्धतीने सुरू आहेत हे पाहिले असता सांतिनेज, महालक्ष्मी मंदिर, पणजी बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

सांतिनेज रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या चरांमध्ये पाईप घालण्याचे काम सुरू होते. काही ठिकाणी पेव्हर्स बसविणे, रस्‍त्याच्या बाजूचे लहान कॉलम भरणे, पेव्हर्स बसविण्यासाठी उतरविणे, खोदलेल्या रस्त्यातील माती, दगड, डांबराचे मोठे तुकडे भरून उडविणे आदी कामे सुरू होती.

पणजी शहरात सुरू असलेल्या कामामुळे होत असलेल्या कामामुळे प्रदूषण होत आहे का? हे तपासण्यासाठी गोवा प्रदूषण महामंडळाची यंत्रणा पणजी शहरात वाहनांमध्ये उभारण्यात आली आहे. या कामामुळे प्रदूषण होत आहे का? याचा अहवाल उच्च न्यायालयाला देण्यात आला आहे. त्यामुळे या कामाचा पंचनामा बुधवारी सुनावणीत न्यायालयातच होईल.

Panaji Smart City
HC judges inspect Smart City Panaji: स्मार्ट सिटीतील 18 प्रकल्प अपूर्ण, अजून तीन महिने हवी मुदतवाढ

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे चारचाकी वाहनधारकांना नियोजित मार्गानेच येजा करावी लागत आहे. परंतु दुचाकीस्वार पाहिजे तेथून त्याठिकाणाहून मार्ग काढीत आहेत. दूरचा वळसा घालून जाणे जिकीरीचे होत असल्याने अनेकजण ‘शॉर्टकट’ अवलंबताना दिसत आहेत.

काही ठिकाणी सायकलस्वारही जवळचा मार्ग काढीत आहेत. दुचाकीस्वार महिलेलाही तिची दुचाकी ढकलतानाचे चित्र सांतिनेज परिसरात दिसून आले.

पेव्हर्सच्या कामाला गती

पणजी बाजार परिसरातील जुनी गटारे साफ करण्याचे काम सुरू आहे. तसेच रस्त्यालगत पेव्हर्स बसविणे आदी काम सुरू असून, पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकामाला सुरूवात करण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून तेथील रस्त्यालगत पेव्हर्स बसविण्याठी कॉंक्रीट घातले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com