वास्को 11 व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त पथनाट्य सादर करताना Dainik Gomantak
गोवा

Goa News: वाहतूक संचालनालय गोवा सरकारतर्फे वास्कोत 'रस्ता सुरक्षा सप्ताह' साजरा

लायन्स क्लब ऑफ वास्को-द-गामा, परिवहन संचालनालय आणि लायन्स क्लब ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आज रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला.

दैनिक गोमन्तक

वास्को: लायन्स क्लब ऑफ वास्को-द-गामा आणि लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट अंतर्गत परिवहन संचालनालय गोवा सरकार आणि लायन्स क्लब ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आज वास्कोत 'रस्ता सुरक्षा सप्ताह' साजरा करण्यात आला.

(Traffic Directorate Goa Govt observes 'Road Safety Week' on 11 vasco)

वास्को 11 व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त पथनाट्य सादर करताना

वाहतूक संचालनालय गोवा सरकारतर्फे 11 वा राज्य रस्ता सुरक्षा आठवडा 2022 "लवकर सुरू करा, सुरक्षितपणे गाडी चालवा, सुरक्षितपणे पोहोचा या शीर्षकाखाली 10 ते 16 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येत असून यांचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब ऑफ वास्को-द-गामा, परिवहन संचालनालय आणि लायन्स क्लब ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आज रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला.

यात स्मिता पाटील स्ट्रीट थिएटर अकॅडमी मुंबईच्या खास निमंत्रित कलाकारांच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन, ड्रायव्हिंग आणि ड्रायव्हिंग करताना दारूचे सेवन या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. याप्रसंगी लाइन्स क्लबचे प्रदेश अध्यक्ष डॉ. कीर्ती नाईक यांच्या समवेत वाहतूक पोलिस उपअधिक्षक एम जी म्हाळसेकर, हेड कॉन्सस्टेबल प्रदिप भगत, पोलिस कॉन्सस्टेबल एम आर पिल्लई, घनश्याम पालकर उपस्थित होते.

वास्को 11 व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त पथनाट्य सादर करताना

या कार्यक्रमात शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, टॅक्सी रिक्षा चालक आणि स्थानिकासह मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी पटनाट्य पाहिले. या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे मुख्य उद्देश म्हणजे सर्व वाहन वापरकर्त्यांमध्ये जागृती आणणे हा होता.

ज्यात किशोरवयीन मुले परवाना नसताना वाहन चालवतात आणि जे हेल्मेट वापरत नाहीत, सीट बेल्ट लावत नाहीत आणि भरदाव वेगाने वाहने हातात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या सर्वांसाठी हा कार्यक्रम डोळे उघडणारा होता. असा या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे शीर्षक "लवकर सुरू करा, बजावात्मक वाहन चालवा, सुरक्षितपणे पोहोचा" असे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT