Goa Traffic Issue
Goa Traffic Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Issue: म्हापशात वाहतुकीचा फज्जा!

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Traffic Issue मागील वर्षापासून म्हापसा कोर्ट जंक्शनवर अवजड रहदारीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कारण यापूर्वी बसवलेले स्वयंचलित वाहतूक सिग्नल काढून टाकले असून म्हापसा पालिकेला अद्याप नवीन सिग्नल उभारण्यात यश आलेले नाही. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होतेय.

या कोर्ट जंक्शनवर गेल्या अकरा महिन्यांपासून सिग्नल बसविण्यासाठी म्हापसा पालिका धडपड करीत आहे. मात्र अजून पालिकेला यश आलेले नाही.

अशातच येत्या मार्च अखेरपर्यंत चौकात वाहतूक सिग्नल्स कार्यान्वित होतील, असा पालिकेने दावा केलाय. काल मंगळवारी म्हापसा पालिका मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत या सिग्नलचा विषयावरुन विरोधी नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच सुनावले.

म्हापसा कोर्ट परिसर हे व्यस्त जंक्शन व प्रमुख चौक. त्यामुळे सातत्याने कोंडी आणि लहान-मोठे अपघात होतात. सिग्नलच्या सुसूत्रीकरणाचा अभाव आणि सिग्नल उभारणीबाबत ठोस धोरण नसल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

या जंक्शनच्या आवारात सरकारी आस्थापने तसेच अनेक विद्यालये आहेत. त्यामुळे सकाळ, दुपारी, संध्‍याकाळी या ठिकाणी वाहतुकीची मोठी वर्दळ असते. शिवाय पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते. एकूणच सिग्नलअभावी वाहतुकीचा फज्जा उडत आहे.

पालिकेने 2018 मध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीअंतर्गत स्वयंचलित वाहतूक सिग्नल बसवण्याचे काम सुशोभीकरणासह केले होते.

मात्र या काळात सिग्नल्सच्या देखभालीअभावी अडचणी येऊ लागल्या आणि जवळपास वर्षभर वाहतूक सिग्नल्स नीट काम करत नव्हते. कधी-कधी दिवे नीट लागत नव्हते किंवा दृश्यमानता कमी असायची. त्यामुळे वाहनचालकांमध्‍ये गोंधळ उडायचा.

सकाळ, दुपारी प्रचंड कोंडी : म्‍हापसा पालिकेने मध्यंतरी एका खासगी कंपनीमार्फत या जंक्‍शनवर नवीन सिग्नल्स आणून बसविले. मात्र तांत्रिक कारणांमुळे ते काम पुढे गेले नाही. आता या मार्च अखेरपर्यंत नवीन वाहतूक सिग्नल्स कार्यान्वित होतील, असा पालिकेचा दावा आहे.

वाहतूक सिग्नल्सच्या कामकाजात दिरंगाई झाल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतोय. तसेच कोर्ट जंक्शनवर सकाळ, दुपारी मोठी वाहतूक कोंडी होते. सध्या वाहतूक पोलिसांमार्फत या जंक्शनचे व्यवस्थपान होत आहे.

नवीन वाहतूक सिग्नल बसविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली आहे. नवीन कंपनीसोबत करारपत्र करायचे बाकी आहे. हे काम थोड्याच दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर कोर्ट जंक्शनवर वाहतूक सिग्नल कार्यान्वित करण्‍यात येणार आहेत..

- अमितेश शिरवईकर म्हापसा मुख्याधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT