Wholesale Fish Market Margao Dainik Gomantak
गोवा

Margao Fish Market: घाऊक मासळी मार्केटमध्ये मासळी विक्रीसाठी जागा द्यावी; पारंपरिक मच्छीमारांची मागणी

Wholesale Fish Market Margao: केवळ परप्रांतीय मच्छीमारांनाच मार्केटमध्ये प्रवेश दिला जातो असा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगाव येथील घाऊक मासळी मार्केटमध्ये गोमंतकीय पारंपरिक मासळी विक्रेत्यांनी आज निषेध करून मासळी विक्रीसाठी जागा देण्याची मागणी केली. केवळ परप्रांतीय मच्छीमारांनाच मार्केटमध्ये प्रवेश दिला जातो व आमची वाहने बाहेर ठेवली जातात. मार्केटच्या बाहेर जिथे आम्ही बसतो तिथे त्यांची वाहने आणून ठेवली जातात. अशाप्रकारे आमची सतावणूक चालू सुरू असल्याचे स्थानिक मासळी विक्रेत्यांनी सांगितले.

दरम्यान, हा प्रश्‍न विधानसभेत शून्य तासात बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे व गोमंतकीय पारंपरिक मासळी विक्रेत्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी केली.

गोमंतकीय मासळी विक्रेत्यांकडे ताजी मासळी असते, तर या परप्रांतीय मासळी विक्रेत्यांची मासळी बर्फामुळे गोठलेली असते, असे व्हेन्झी यांनी सांगितले.

यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, या घाऊक मासळी मार्केटमध्ये किरकोळ विक्री करता येत नाही. यावेळी व्हेन्झी यांनी सांगितले की, गोमंतकीय मासळी विक्रेत्यांना त्यांच्या वाहनातून मासळी उतरवू दिली जात नाही. तसेच गोमंतकीय मासळी विक्रेत्यांना सकाळी ११ वा.पर्यंत तिथे बसण्यास मुभा द्यावी.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी याच प्रश्र्नावरुन मोठा गोंधळ झाला होता व नंतर गोमंतकीय मासळी विक्रेत्यांना सकाळी ११ वा.पर्यंत आपली वाहने घाऊक मासळी मार्केटमध्ये आणण्याची मुभा देण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT