Margao Fish Market: नको रे बाबा, मडगाव मासळी बाजार! ग्राहकांनी फिरविली पाठ

Margao News: सर्वत्र घाण, डासांचे साम्राज्‍य आणि दुर्गंधी; निसरडीमुळे अनेकजण इस्‍पितळात
Margao News: सर्वत्र घाण, डासांचे साम्राज्‍य आणि दुर्गंधी; निसरडीमुळे अनेकजण इस्‍पितळात
Margao Fish Market IssuesDainik Gomantak
Published on
Updated on

मडगावातील किरकोळ मासळी बाजारात घाणीचे साम्राज्‍य वाढले असून, डासांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्‍यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे. याबाबत तेथे बसणाऱ्या मासळीविक्रेत्‍या महिलांना विचारले असता त्‍यांनी सांगितले की, ‘आम्‍हाला या घाणीत जीवन जगण्याची आता सवयच झालेली आहे’. दरम्‍यान, एसजीपीडीए व संबंधित खात्‍याचे अधिकारी या समस्‍येवर तोडगा काढण्‍याचे सोडून सुस्तपणे झोपले असल्‍याबद्दल संताप व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

सदर मासळी मार्केटच्या बाहेर टाकण्यात आलेले थर्माकोलचे बॉक्स, कुजकी मासळी, इतर ओला कचरा, सांडपाणी आणि उघड्या नाल्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्‍थानिक आमदारांनाही याचे काहीच पडलेले नाही का? असा सवाल मासळीविक्रेत्‍या महिलांनी उपस्‍थित केला आहे.

सदर मासळी मार्केटची सध्या दुरवस्था झाली आहे. दुर्गंधीयुक्त व प्रदूषित पाणी आणि उघड्या गटारांमुळे परिसरात डासांची एवढी पैदास झाली आहे की तेथे एक मिनिट राहणेसुद्धा कठीण बनले आहे. फ्लोअरिंग निसरडे बनले असून अनेक ग्राहक पडून जखमी झाल्‍यामुळे त्‍यांना उपचारांसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात न्यावे लागले आहे. गटाराची धातूची झाकणे वरच्या बाजूला वाकलेली आहेत. त्‍यावर दगड ठेवून तात्‍पुरती व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

दुर्गंधीमुळे अनेक ग्राहकांनी या मासळी मार्केटकडे पाठ फिरविली आहे. पण रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्‍यांकडून ते मास खरेदी करत असल्‍यामुळे अपघाताची शक्‍यताही वाढली आहे. देखभालीअभावी गेल्या काही वर्षांपासून बाजारपेठेची दुरवस्था झाल्याचे विक्रेत्‍यांचे म्हणणे आहे.

नाले उघडे आणि दूषित पाण्याने भरलेले आहेत. शिवाय बाजाराच्या आजूबाजूचा परिसर अधिकच अस्वच्छ आहे. तेथे टाकण्यात येत असलेली कुजकी मासळी, ओला कचरा दिवसेंदिवस उचलला जात नसल्याने ही समस्‍या उग्र बनली आहे. एसजीपीडीए मार्केटचे चेअरमन कधीच या ठिकाणी भेट देत नाहीत, अशी विक्रेत्‍यांची तक्रार आहे.

Margao News: सर्वत्र घाण, डासांचे साम्राज्‍य आणि दुर्गंधी; निसरडीमुळे अनेकजण इस्‍पितळात
Bicholim Fish Market : ‘सुक्‍या’ मासेविक्रेत्‍यांचे अतिक्रमण; स्‍थानिकांना फटका

या मार्केटपेक्षा ‘सोनसडो’ खूप बरा

दुर्गंधीमुळे ग्राहक कमी झाले आहेत. ते रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या लमाणींकडून मासे विकत घेतात. त्‍यामुळे आमचा व्‍यवसाय ठप्‍प झाला आहे, असे मासेविक्रेती महिला बिबियाना मिरांडा यांनी सांगितले.

त्‍या म्‍हणाल्‍या, या मार्केटपेक्षा ‘सोनसडो’ बरा. पण पोटासाठी या घाणीत बसावे लागते. आम्ही गरीब लोक आहोत. आम्हाला मदत करा. येथे पाण्याचीसुद्धा व्यवस्था नाही, अशी कैफियत त्‍यांनी मांडली.

नोरोन्हा नामक एका मासळीविक्रेत्‍याने सांगितले की, आमच्‍याकडून सोपो कर न चुकता गोळा

केला जातो, पण या मासळी बाजारात कोणत्‍याच सुविधा नाहीत. पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागते.

मासळी बाजारात अजिबात स्वच्छता नाही. फरशा तुटल्या असून, ज्‍या आहेत त्‍या निसरड्या बनल्‍या आहेत. त्‍यामुळे ज्‍येष्‍ठ नागरिकांसह अनेक जण पडले असून त्यांच्‍यावर इस्‍पितळ गाठण्‍याची वेळ आली आहे. एसजीपीडीएचे अध्यक्ष तथा आमदार दाजी साळकर यांचे तर या मार्केटकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.

फातिमा फर्नांडिस, मासेविक्रेती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com