workers Dainik gomantak
गोवा

कामगारांच्या समस्या त्वरित सोडवा

भारतीय ट्रेड युनियन यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

दैनिक गोमन्तक

पणजी : अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्या गोवा राज्य समितीने अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ सोडविण्याची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली आहे. कदंबा, ग्रामपंचायत, विद्युत विभाग, साबांखा, कामगार पुरवठा संस्था, नदी जलवाहतूक विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि पूर्व प्राथमिक मदतनीस यांच्या मागण्यांच्या त्यात समावेश आहे.

अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्या गोवातर्फे जुलै 2021 पासूनच महागाई भत्त्यासह किमान वेतनात त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे. रू 750 अकुशल श्रेणीसाठी, अर्ध-कुशल वर्गासाठी रु. 825, कुशल कामगारांना रु.910 आणि उच्च कुशल श्रेणीतील कामगारांना रु. 1000/- प्रतिदिन. द्यावे. जेणेकरून गोव्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या 2.5 लाख कामगारांना थेट लाभ होईल, असेही युनियनने निवेदनात म्हटले आहे.

सरकारी विभाग आणि साबांखा, कदंब महामंडळ, अंगणवाडी, पूर्व प्राथमिक मदतनीस, पंचायत आणि इतर यांसारख्या सरकारी उपकरणांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना समान कामासाठी समान वेतन, या कायद्याची अंमलबजावणी करावी. लाईन मदतनिसांच्या सेवा नियमित करा, अशा मागण्या मान्य कराव्या, असेही निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar Yojana: "म्हज्या गोंयकारांक चवथीचें गिफ्ट" मुख्यमंत्र्यांची घोषणा! माझे घर योजनेतून 450 कुटुंबांना मिळणार मालकी हक्क

Modi Express For Ganeshotsav: 'कोकणात' जाऊचो आनंद काय वेगळोच... गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस' धावली, नितेश राणेंचा रेल्वेत फेरफटका Watch Video

12 कोटी कॅश, 6 कोटींचे दागिने, १ कोटी परकीय चलन आणि अलिशान कार; काँग्रेस आमदाराला अटक, गोव्यात केली होती छापेमारी

फोटो द्या आणि कलात्मक चित्र मिळवा! गोव्यात सुरू झालाय 'मारियो मिरांडा'च्या शैलीत स्वतःचं चित्र बनवून देणारा उपक्रम

Goa News Live Update: आमदार जीत आरोलकर यांनी गणेश चतुर्थी निमित्त आगरवाडा येथे कडधान्याचे वाटप केले

SCROLL FOR NEXT