Accident At Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: रस्त्यात वाहन रुतण्याच्या ‘स्मार्ट’ घटना कायम; राजधानीतील सांतिनेजमधील प्रकार

मोठ्या व्यासाच्या वाहिन्या टाकण्याचे काम सुरू

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panaji Smart City: राजधानी पणजीत भारामुळे रस्ते खचून त्यात अवजड वाहने रुतण्याचे प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नाहीत, असे दिसते.

सांतिनेजमध्ये सोमवारी (ता.17) दुपारी 12.30 वा.च्या सुमारास पाणी वाहून नेणाऱ्या टँकरच्या मागील टाकीच्या ओझ्यामुळे रस्ता खचला आणि त्यात त्या टाकीचे चाक अडकून पडले. त्यामुळे नेहमीप्रमाणे सांतिनेजमध्ये वाहतूक कोंडीचा प्रकार काही वेळ दिसून आला.

राजधानीच्या सर्व भागातून येणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्यांतून येणारे सांडपाणी सांतिनेजमधून मोठ्या वाहिनीतून टोंक येथील प्रकल्पात नेले जाणार आहे. त्यासाठी मोठ्या व्यासाच्या वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे.

गेली दीड-दोन महिन्यांपासून या परिसरात हे काम सुरू आहे. याठिकाणी मागील वेळेस टँकर आणि अवजड डंपरही रुतण्याचा प्रकार घडला होता.

‘ड्रिलिंग’चा परिणाम

भूमिगत मोठी वाहिनी टाकण्यासाठी करण्यात येत असलेल्या ड्रिलिंगमुळे त्या यंत्राच्या बाजूचा आणि वरचा भागही ठिसूळ बनत आहे. जमिनीतील मातीत चिकटपणा नसल्याने माती ओझामुळे खचते, असे प्रकार घडतात.

डांबरीकरणामुळे वरून हा प्रकार दिसून येत नाही, वाहनांच्या ओझ्यामुळे खचलेल्या जागेत चाक रुतल्यानंतर तो प्रकार दिसून येतो, असे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT