Goa Viral Video Dainik Gomantak
गोवा

Goa Viral Video: रेन्ट कारच्या छतावर उभे राहून पर्यटकांचा डान्स, सोशल मिडियातून संताप व्यक्त

मौजमस्ती करण्यासाठी गोव्यात येणारे काही पर्यटक अनेकवेळा वाहतूक नियम मोडताना दिसून येतात

Pramod Yadav

Goa Viral Video: मौजमस्ती करण्यासाठी गोव्यात येणारे काही पर्यटक अनेकवेळा वाहतूक नियम मोडताना दिसून येतात. बऱ्याचवेळा अशा घटना समोर आल्या आहेत. संबधित घटनेचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेत. पोलिसांनी संबधितांवर कारवाई देखील केलीय.

दरम्यान, अशीच एक घटना सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यात काही पर्यटक रेन्ट कॅबच्या छतावर नाचताना दिसत आहेत.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, रेन्ट कॅबच्या छतावर दोन तरूण नाचताना दिसत आहेत. कारचे दोन्ही दरवाजे खुले ठेऊन दोघे छतावर नाचत आहेत, तर, कोणी तरी त्यांचा व्हिडिओ चित्रित करताना दिसत आहे. दरम्यान, याच घटनेचा व्हिडिओ येथील स्थानिकांनी देखील चित्रित केला. व्हिडिओमध्ये GA 03 AH 4948 ही महिंद्रा थार रेन्ट कॅब दिसत आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर सध्या तो सर्वत्र व्हायरल होत आहे. पर्यटकांच्या या कृतीवर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. लोकांनी पर्यटकांच्या कृतीचा निषेध केला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ गोव्यातील कोणत्या भागातील आहे याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

अशा प्रकारच्या घटना नेहमीच समोर येत असतात, राज्यात येणारे पर्यटक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत विचित्र गोष्टी करताना दिसतात. कधी वाहनाच्या बाहेर येत हातवारे, नृत्य केले जाते. तसेच, कधी बीचवर पर्यटक वाहने घेऊन जातात.

त्यामुळे गोव्यात सब कुछ चलता है? अशी खोचक प्रतिक्रिया लोक देत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगांरुची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT