Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अन् चोरट्यांनी पोलिसांसमोर हात जोडले; कांदोळीत ज्वेलरी दुकानात दरोडा, तिघे पर्यटक ताब्यात

Candolim Gold Shop Robbery: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कांदोळी येथे शनिवारी (१९ एप्रिल) एका ज्वेलरी दुकानात दरोडा टाकून चोरी करणाऱ्या तीन पर्यटकांना स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही तासांतच ताब्यात घेण्यात आलं.

Sameer Amunekar

पणजी: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कांदोळी येथे शनिवारी (१९ एप्रिल) एका ज्वेलरी दुकानात दरोडा टाकून चोरी करणाऱ्या तीन पर्यटकांना स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही तासांतच ताब्यात घेण्यात आलं. आरोपींनी दुकानातून एक ब्रेसलेट आणि इतर काही वस्तू चोरल्या होत्या.

समोर आलेल्या माहितीनुसार, कांदोळी येथील एका दागिन्यांच्या दुकानात तीन पर्यटकांनी प्रवेश केला आणि एका सोन्याच्या ब्रेसलेटसह काही मौल्यवान वस्तू चोरून पसार झाले.

याच दरम्यान, बंगळुरूचा रहिवासी मनोज सिम्हिया (वय २१) समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असताना त्याने या तिघांना दुकानातून चोरी केल्यानंतर पसार होताना पाहिलं होतं. संशय येताच त्याने तत्काळ स्थानिक नागरिकांना याची माहिती दिली आणि नंतर पोलिसांना कळविण्यात आलं.

कांदोळी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि काही वेळातच तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून चोरी केलेलं सोन्याचं ब्रेसलेट तसेच इतर मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

गोवा हे देशभरातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असले तरी, काही पर्यटकांमुळे येथील कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची प्रकरण अधूनमधून समोर येतात. पोलिस प्रशासनाने अशा घटनांवर कठोर कारवाई करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj: सिराज 5 विकेट घेणार, माजी गोलंदाजांचे बोलणे ठरले खरे; ट्विट होतेय Viral

Rashi Bhavishya 05 August 2025: घरात मंगल कार्याची चर्चा, बँक व्यवहारात फायदा; संयमाने व्यवहार करा

Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ फेरबदल कधी? दामू नाईकांनी टाळले उत्तर, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी..

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

SCROLL FOR NEXT