Morjim Beach Tourists Dainik Gomantak
गोवा

Morjim Beach: पर्यटकांना स्टंटबाजी भोवली! बीचवर घेऊन गेले कार; दोघांवर गुन्हा, कार जप्त

Morjim Beach Tourists: अनेकदा मस्ती केल्यानंतर काय होतं याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. दोन पर्यटकांनी मोरजी किनाऱ्यावर चक्क गाडी समुद्रात घातली होती.

Sameer Amunekar

पणजी : मस्ती केल्यानंतर काय होतं याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. गोव्यातील मोरजी समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेल्या दोन पर्यटकांनी गाडी चक्क समुद्रकिनाऱ्यावर घातली. पर्यटकांच्या या कारनाम्यामुळं दोन्ही गाड्या किनाऱ्यावरच्या वाळूमध्ये अडकल्या. याप्रकरणी आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आलीय.

मोरजी किनाऱ्यावरील वाळूमध्ये अडकलेल्या दोन्ही कारच्या चालकांविरुद्ध मांद्रे पोलिसांकडून निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

अतिउत्साही पर्यटकांच्या कारनाम्यामुळं दोन्ही गाड्या किनाऱ्यावरच्या वाळूमध्ये अडकल्या होत्या. दरम्यान, मांद्रे पोलिसांनी दोन्ही गाड्या वाळूतून बाहेर काढत जप्त केल्या आहेत. वाहनांच्या चालकांविरुद्ध बीएनएसच्या कलम २८१ आणि १२५ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलाय.

पर्यटकांच्या कारनाम्यामुळं दोन्ही गाड्या किनाऱ्यावरच्या वाळूमध्ये अडकल्या होत्या. एकाच ठिकाणी गाडी वाळूत रूतली होती. अखेर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही गाड्या बाहेर काढून जप्त केल्या आहेत.

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणात भिरायला येतात. या समुद्र किनाऱ्यांवर आनंद पर्यटकांकडून लुटला जात आहे. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक देखील पाहायला मिळत आहेत.

समुद्रकिनाऱ्यावर वाहन घेऊन जाण्यास मनाई आहे. असे केल्यास कायद्याने संबधितांवर कायेदशीर कारवाई तसेच दंडाची तरदूत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT