Tourist Harassment in Goa Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! गोव्यात महाराष्ट्रातील पर्यटकांना मारहाण करून लूटमार

Tourist Harassment in Goa : तीन संशयितांना म्हापशात अटक; पोलिसांची कारवाई

दैनिक गोमन्तक

Tourist Harassment in Goa : महाराष्ट्रातून गोव्यात आलेल्या पर्यटकांना मारहाण करून त्यांना धमकी देत त्यांची फसवणूक व लूटमार केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सामाजिक माध्यमांवरून हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर म्हापसा पोलिसांनी यासंदर्भात भारतीय दंड संहितेच्या 147, 504, 323, 395, 506(2) या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी सचिन भारदद्वाज, आशिष सिंग (दोघेही हरियानाचे) व मुबारक मुल्ला (कळंगुट, मूळचा तमिळनाडूमधील) यांना अटक करण्यात आली आहे. (Tourist Harassment in Goa)

यासंदर्भात म्हापशाचे विभागीय पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांना कोल्हापूरमधील चंदगड भागातील प्रवीण पाटील यांच्याकडून तक्रार आली होती.

मारहाण व लूटमारीची घटना 23 मार्च रोजी घडली होती. तथापि, यासंदर्भात अन्याय झालेल्या तरुण पिढीतील त्या व्यक्ती भयभीत झाल्याने त्यांनी तत्काळ नोंदवली नाही व कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतरच त्यांनी यासंदर्भात आवाज उठवला, असे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास म्हापशाचे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी आणि उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विराज कोरगावकर करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT