Tourist place in Netravali |Bubbling Lake Dainik Gomantak
गोवा

‘नेत्रावळी’कडे पर्यटकांनी फिरवली पाठ

स्थानिकांच्या रोजगारावर गदा: भरमसाठ शुल्क आकारणीचा परिणाम

दैनिक गोमन्तक

सांगे: नेत्रावळी गाव पर्यटनदृष्ट्या रोजगार मिळवून देणारा ग्रामीण भाग आहे. तरी नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रात विकसित होत असलेल्या पर्यटनस्थळावर जाण्यासाठी खात्याकडून भरमसाठ शुल्क आकारणी होऊ लागल्याने पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. परिणामी नेत्रावळीतील स्थानिकांचा रोजगार बुडाला आहे. खाण बंदी काळात एकमेव रोजगार संधी असलेल्या गावात पर्यटकांची गर्दी असायची. मात्र, ऐन हंगामात नेत्रावळी गावात पर्यटन विकसित होत असताना वन खात्याने वाहन शुल्क व पर्यटकांना प्रवेश शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त करून नेत्रावळीऐवजी अन्य भागांना भेटी देणे पसंत केल्याने गजबजणारा नेत्रावळी गाव ऐन हंगामात ओस पडू लागला आहे.

पर्यटकांच्या म्हणण्यानुसार चारचाकी वाहनाला 500/-व प्रत्येक पर्यटकाला 100/-शुल्क आकारू लागल्याने अनेक पर्यटक शुल्क ऐकून आल्या पावली परत जाऊ लागले आहेत. स्थानिक पर्यटक असो किंवा बाहेरील पर्यटक असो शुल्क समानच आहे. मात्र,हे शुल्क सामान्य पर्यटकांना परवडत नाही. दूरवरून येणारे पर्यटक हुज्जत घालत शुल्क भरून आपल्या गावात नेत्रावळीविषयी चुकीचा संदेश पसरवत असल्यामुळे पर्यटक संख्या कमी होत गेली आहे. याचा परिणाम स्थानिकांच्या रोजगारावर झाला आहे.

खाण बंदीमुळे सर्वांचाच रोजगार हिरावला गेलेला असल्यामुळे धबधबे, बुडबुड तळी, स्ट्रॉबेरी लागवड, बागायती, मंदिरे, थंड हवेचे ठिकाण, मसाला प्लांटेशन अशा अनेक स्थळांमुळे नेत्रावळी गावाला रोजगार प्राप्ती होऊ लागली होती. मात्र, अचानक वन खात्याने पर्यटक शुल्क वाढविल्याने पर्यटक पाठ फिरवू लागले आहेत. आता वन खात्याने शुल्क कमी केले असले तरी पर्यटकांनी नेत्रावळी गावात पर्यटकांची पावले वळावीत यासाठी वन खात्याने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

SCROLL FOR NEXT