Tourist Information Centre at Candolim dainik gomantak
गोवा

कांदोळीच्या पर्यटन माहिती केंद्रात 'नमस्ते चाय काउंटर'; कोण भागीदार, कोणाला मिळतोय नफा? परबांचा सवाल

रिव्होल्युशनरी गोवन्सचे संस्थापक मनोज परब नेहमी विविध मुद्दे उपस्थित करत असतात.

Pramod Yadav

रिव्होल्युशनरी गोवन्सचे संस्थापक मनोज परब (Manoj Parab) नेहमी विविध मुद्दे उपस्थित करत असतात. अलिकडेच त्यांनी म्हादई जागृतीसाठी काढलेली पदयात्रा चर्चेत राहिली, दरम्यान पहिल्याच दिवशी ही पदयात्रा रोखण्यात आली. विविध मुद्दे उपस्थित करत पदयात्रेला अटकाव करण्यात आला.

परब यांनी नुकतेच कांदोळी येथील पर्यटन माहिती केंद्रावरून (Tourist Information Centre, Candolim) काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, गोवा सरकार एवढे दिवाळखोर झाले का? असेही परबांनी म्हटले आहे.

मनोज परब यांनी कांदोळी येथील पर्यटन माहिती केंद्राचे दोन फोटो शेअर करत एक ट्विट केले आहेत. "कांदोळी येथील पर्यटन माहिती केंद्रात नमस्ते चाय काउंटर आहे.. वाह भाई वाह... सरकार इतके दिवाळखोर झाले आहे का??? पर्यटन मंत्री रोहन खंवटे, यात भागीदार कोण आहे??? याचा नफा कोणाला मिळतोय???" असे ट्विट मनोज परब यांनी केले आहे.

मनोज परब यांनी ट्विटमध्ये पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांना टॅग करून प्रश्न विचारले आहेत.

याशिवाय एसपी उत्तर गोवा, गोवा पोलिस महासंचालक आणि गोवा मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विट अकाउंटला टॅग करून त्यांचा उत्पन्न मिळवण्याचा हा नवीन मार्ग आहे का?? असा खळबळजनक सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, याबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारचा अधिकृत खुलासा किंवा माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT