MORJIM  Dainik Gomantak
गोवा

Goa: पर्यटकांना हूल्लडबाजी भोवली; कार रुतली बिचवर

मोरजी सागर किनाऱ्यावर कार अडकली

दैनिक गोमन्तक

मोरजी: गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे दरवर्षी येथे लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. जीवाचा गोवा करून ते निघून जातात. पण काही पर्यटक दारूच्या नशेत मस्ती करतात. त्यांच्या अतिरेकाने स्थानिक ग्रामस्थच नाही तर सरकारी यंत्रणांचीही तारांबळ उडते. काही दिवसांपूर्वी दारूच्या नशेत समुद्राच्या पाण्यात गाडी नेण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुदैवाने अनर्थ टळला होता.

(TOURIST FROM MUMBAI DRIVE CAR STUCK ON MORJIM BEACH)

आजही तसाच प्रकार घडला आहे महाराष्ट्रात नोंदणी झालेली एक कार भरधाव वेगाने मोरजी किनारी भागात फिरवताना समुद्राच्या पाण्यात खचली. याला फक्त पर्यटकांचा अतिरेक होतो आहे असचं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अलीकडच्या काळात पावसाळ्यातही गोव्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने किनारी भागात येऊन पर्यटनाचा आनंद लुटत असतात. बहूतांशी सुव्यवस्थित पर्यटनाचा आनंद घेत गोव्यातून परतात मात्र काही पर्यटक दारुच्या नशेत अतिरेक करत असल्याचे सासत्याने समोर येत आहे. त्यामूळे अशा मस्तीखोर पर्यटकांना गोवा पोलिसांनी अद्दल घडवणे आवश्यक आहे. तसेच गोवा प्रशासनाने ही अशा प्रकारांना कसा चाप घालता येईल यावर विचार करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT