Goa Tourism Development Corporation To Start Bus Mayem Lake 
गोवा

Mayem Lake Goa: मये तलावावर पर्यटक बससेवा सुरू

Bus Service: दर शनिवारी जीटीडीसी पर्यटक बस पर्यटकांना घेऊन मये तलावावर येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Mayem Lake Goa: पर्यटन स्थळ म्हणून देश-विदेशात प्रसिद्धीस पावलेल्या मये तलावाच्या पर्यटनाला आता बहार येण्याची आशा निर्माण झाली आहे. ''पर्यटन सर्किट'' अंतर्गत पर्यटन विकास महामंडळातर्फे मये तलावावर पर्यटक बससेवा सुरू केली आहे.

तब्बल आठ वर्षांच्या कालखंडानंतर शनिवारी दुपारी ''जीटीडीसी''च्या पर्यटक बसचे मये तलावस्थळी आगमन झाले. पर्यटक बस तलावावर येताच स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पर्यटक बस आणि पर्यटकांचे स्वागत केले.

यावेळी जीटीडीसीचे अधिकारी, नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर आदी उपस्थित होते. सकाळी म्हापसा रेसिडेन्सी येथून आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पर्यटक बसला बावटा दाखवल्यानंतर बससेवा पर्यटन स्थळ दर्शन प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

बंजी जंपिंग सुविधा

विकसीत काम आणि नंतर कोरोना महामारी यामुळे गेल्या सात-आठ वर्षांपासून मये तलाव पर्यटनासाठी बंद होता. त्यामुळे या तलावावर अवकळा पसरली होती. मध्यंतरी दोन वर्षांपूर्वी विकसित कामाचे उद्घाटन करतानाच ''बंजी जंपिंग'' सुविधा सुरू केल्यानंतर या तलावावर अधूनमधून पर्यटक भेट देत आहेत

या तलावात बोटिंग सुविधाही सुरू करण्यात आली आहे. आता जीटीडीसीतर्फे पर्यटक बससेवा सुरू केल्यामुळे या तलावाला हळूहळू गतवैभव प्राप्त होण्याचे संकेत मिळाले आहेत. सध्या तरी दर शनिवारी जीटीडीसी पर्यटक बस पर्यटकांना घेऊन मये तलावावर येणार आहे.

पक्षी अभयारण्य, मंदिरांना भेटी

मये तलावावर पर्यटक बससेवा सुरू केल्याबद्दल आमदार प्रेमेंद्र शेट यांनी समाधान व्यक्त केले आहे. पर्यटक बससेवा सुरू केल्यानंतर पर्यटन मंत्री रोहन खंवटे, जीटीडीसीचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर तसेच अधिकारीवर्गाला त्यांनी धन्यवाद दिले आहेत.

''पर्यटन सर्किट''अंतर्गत आता पर्यटकांना उत्तर गोव्यातील अन्य पर्यटन स्थळासह मये मतदारसंघातील तलावासह नार्वेतील ऐतिहासिक सप्तकोटीश्वर देवस्थान आणि चोडण येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य या स्थळाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे, असे प्रेमेंद्र शेट म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT