Goa taxi drivers harassment Dainik Gomantak
गोवा

टक्सीवाल्यांनी ब्लॅकमेल केलं, त्रास दिला; पर्यटक संतापला म्हणाला, पुढच्यावेळी गोवा की फुकेत? याचा विचार करावा लागेल

Tourist blackmailed in Goa: पुढच्यावेळी गोव्यात यायचं का फुकेतला जायचं? याबाबत देखील विचार करावा लागेल, असे या पर्यटकाने म्हटले आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या मुजोरीला अनेक पर्यटक बळी पडले आहेत. याबाबत वारंवार विविध घटना समोर आल्या आहेत. पर्यटकांनी व्हिडिओच्या माध्यमातून गोव्यात घडलेल्या आपबीतीचे कथनही केले आहे. याच महिन्यात नुकत्याच दोन घटना समोर आल्या असताना आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एक देशी पर्यटक आपल्या कुटुंबीयांसमवेत गोव्यात आला असता त्याला स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या अरेरावीचा सामना करावा लागला. पर्यटकाने गोव्यात घडलेल्या प्रसंगाचे व्हिडिओच्या माध्यमातून कथन केले आहे.

या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विमानतळावर जाण्यासाठी पर्यटकांने टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली असता ती बुकिंग रद्द करुन तिप्पट भाडे अकारुन दुसरी टॅक्सी बुक करण्यास पाडले, असा आरोप पर्यटकाने व्हिडिओतून केला आहे.

व्हिडिओतून पर्यटकाने काय दावा केला?

"कुटुंबीयांसोबत विमानतळावर जाण्यासाठी मी टेम्पो टॅव्हलर बुक केला होता. मी आयटीसी हॉटेलमध्ये थांबलो होतो. पण. टॅक्सी युनियन वाल्यांनी टेम्पोला आत येऊ दिले नाही."

"एवढेच नव्हे तर दुसरी टॅक्सी भाड्याच्या तिप्पट दराने करण्यास भाग पाडले. त्यांनी एकप्रकारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला," असा आरोप पर्यटकाने केला आहे.

गोव्यात अशापद्धतीचा खूप वाईट अनुभव आल्याचे मत पर्यटकाने व्यक्त केले आहे. पुढच्यावेळी गोव्यात यायचं का फुकेतला जायचं? याबाबत देखील विचार करावा लागेल, असे या पर्यटकाने म्हटले आहे.

दरम्यान, याच महिन्यात राज्यातील टॅक्सी माफियांमुळे झालेल्या त्रासाबाबत कैफियत मांडणारी ही तिसरी घटना आहे. यापूर्वी दोन महिला पर्यटकांना स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

राज्यात पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. पण, स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांकडून होणाऱ्या त्रासामुळे पर्यटक हवालदील होतायेत. गेल्या काही दिवसांत अशा तीन घटना समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT