Morjim: 'परवाना एका नावाने, रेस्टॉरंट भलत्याच नावाने'! मोरजीतील धक्कादायक प्रकार; पंचायतीची कारणे दाखवा नोटीस

Morjim restaurant: मोरजी पंचायत क्षेत्रातील गावडेवाडा समुद्रकिनारी भागात ‘मेसर्स ज्युबिलन्ट हॉस्पिटल सर्व्हिसेस’ या नावाने बार आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी पंचायत परवाना मिळाला होता.
Illegal restaurant operation
Illegal restaurant operationDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रातील गावडेवाडा समुद्रकिनारी भागात ‘मेसर्स ज्युबिलन्ट हॉस्पिटल सर्व्हिसेस’ या नावाने बार आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी पंचायत परवाना मिळाला होता. मात्र, या ठिकाणी ‘फर्जी बीच’ या वेगळ्याच नावाने रेस्टॉरंट सुरू असल्याचे समोर आल्यानंतर मोरजी पंचायतीने संबंधित आस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या ठिकाणी व्यवसाय परवान्यावरील नावाऐवजी दुसऱ्याच नावाने व्यवहार सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंचायत मंडळाने गंभीर दखल घेतली. पंचायत सरपंच विलास मोर्जे यांच्या स्वाक्षरीने पाठवलेल्या नोटिशीत, सात दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास परवाना रद्द केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

१६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पंचायत मंडळाच्या पाक्षिक बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. ‘फर्जी बीच’ या नावाने रेस्टॉरंट चालविणे आक्षेपार्ह असून त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे नोटिशीत नमूद आहे.

Illegal restaurant operation
Morjim Beach: 'पर्यटनट' हंगाम सुरू, किनाऱ्यावर मात्र गैरसोय; चेंजिंग रूम, शौचालय, पार्किंग व्यवस्थेकडे दुर्लक्ष

‘सायलेंट झोन’ घोषित केलेल्या या भागात रात्री १० नंतर संगीत कार्यक्रम घेण्यास सरकार परवानगी देत नाही. तरीदेखील काही ठिकाणी संगीत रजनीचे आयोजन केले जात असल्यास, प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Illegal restaurant operation
Morjim Beach: बंदी असताना किनाऱ्यावर फिरवल्या गाड्या, Viral Videoतील दोघांवर कारवाई; प्रत्येकी 5 हजार दंड वसूल

ठोस कारवाईची गरज!

‘फर्जी बीच’ या नावाने सोशल मीडियावर जाहिरात होत असून, ‘प्रायव्हेट बीच’ व संगीत रजनीचे आयोजन अशा उल्लेखांनी संबंधित व्यावसायिकांविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर नामफलकांवर व नियमभंग करणाऱ्यांवर पंचायत व प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com