Rohan Khaunte Gomantak Digital Team
गोवा

Rohan Khaunte: 'या' उपक्रमाअंतर्गत पर्यटन क्षेत्राला मिळणार चालना; पर्यटनमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मंत्री रोहन खंवटे: सांजाव 24, तर चिखलकाला 28 जूनपासून

गोमन्तक डिजिटल टीम

Rohan Khaunte पर्यटन राज्याच्या अर्थकारण तसेच रोजगाराच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक गोव्याला भेट देतात, परंतु आता पर्यटन क्षेत्रात नवसंकल्पना राबविणे गरजेचे आहे.

त्या संकल्पना राबविण्याचे सामर्थ्य आजच्या तरुणाईत असल्याने राज्यातील प्रत्येक शालेय, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून युवा टुरिझम क्लबची स्थापना करणार असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.

गोवा विद्यापीठात आयोजित युवा टुरिझम क्लब संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पर्यटन संचालक सुनील अंचिपाका, प्रा. विद्यानंद मेंडीस, डॉ. करुणा शर्मा, दीपक नार्वेकर उपस्थित होते.

दरम्यान खंवटे म्हणाले, गोव्याच्या पर्यटनाचे पुन्हा र्ब्रँडिंग करण्यासाठी आम्हाला युवकांची साथ हवी आहे. गोव्याची समृद्ध संस्कृती, हजारो वर्ष जुनी मंदिरे, निसर्ग, आध्यात्मिक पर्यटन आदी संकल्पनांना चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात नवीन कल्पना सुचविण्यासाठी युवा टुरिझम क्लब मदत करतील.

‘युवकांना सक्षम करणार’

युवकांकडे नवीन कल्पना असतात. नव निर्माणाची स्फूर्ती असते. वेगळे विचार मांडण्याची व त्याला मूर्त स्वरूप देण्याचे सामर्थ्य असते.

युवकांच्या खांद्यावर जबाबदारी देत त्यांना सक्षम करण्याची जबाबदारी सरकारची आहे. या उपक्रमातून युवकांना प्रोत्साहन देण्याचे व त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

माशेलात विविध सांस्कृतिक कार्यक्रम

गोवा पर्यटन खात्यातर्फे २८ ते ३० जून दरम्यान माशेल येथील देवकीकृष्ण मंदिरात ३ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून २८ व २९ जून रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, तर शेवटच्या दिवशी चिखलकाला होणार आहे.

पर्यटकांना गोव्यातील विविध भाग व तेथील संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच २४ जून रोजी जुने गोवे येथे सांजावचे आयोजन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: जंगली जीवनाचा थरार! अजगराने दोन बेडूक गिळले, पण लोभ नडला; पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

Vidya Balan: 'तुझं नाक खूप मोठं आहे, सर्जरी कर...'; बॉलिवूड दिग्दर्शकाने विद्या बालनला का दिला होता सल्ला? स्वत:च केला मोठा खुलासा

Senior Citizens: देशातील 70 टक्के ज्येष्ठांचा खिसा रिकामा, उदरनिर्वाहासाठी अनेकजण निवृत्तीनंतरही कामावर

IND vs ENG: 'त्याला डिवचणं आमच्या प्लानचा भाग होता...'; जो रुटसोबतच्या वादावर प्रसिद्ध कृष्णाने सोडले मौन!

Goa News Live Update: 'बीएल‍ओ'च्या मानधनात दुपटीने वाढ!

SCROLL FOR NEXT