Tourism Minister Rohan Khaunte | Dona Paula Jetty Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Jetty: दोना पावला जेटीवर आता पर्यटकांसाठी 'इतके' शुल्क; कोस्टल सर्किट प्रोजेक्टचे अनावरण

पर्यटकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

गोमंतक ऑनलाईन टीम

Dona Paula Jetty: पणजीतील दोना पावला जेटी येथे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते शनिवारी कोस्टल सर्किट प्रोजेक्टचे अनावरण करण्यात आले. येथे पर्यटकांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रौढांसाठी प्रत्येकी 50 रूपये आणि 10 ते 18 वयोगटासाठी प्रत्येकी 25 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, याठिकाणी स्थानिकांना मात्र कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. स्थानिकांना मोफत प्रवेश असेल. यावेळी बोलताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

मंत्री खंवटे म्हणाले की, याठिकाणी स्थानिकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी मात्र शुल्क आकारले जाईल. गोव्यात पर्यटकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. बऱ्याचदा पर्यटकच वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, त्यातून अपघात होतात, मात्र त्याचे खापर सरकारवर फोडले जाते. सरकारला पर्यटनाला प्रोत्साहन द्यायचे आहे, पण जबाबदार, सुरक्षित आणि शाश्वत पर्यटनाला आमचे प्राधान्य आहे.

(सविस्तर बातमी देत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT