Rohan Khaunte
Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: राज्यभरात 75 ठिकाणी वायफाय-हॉटस्पॉट सुविधा

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या आणि सर्वांच्या फायद्यासाठी राज्यभरातील सर्व 40 मतदारसंघांमध्ये 75 ठिकाणी वायफाय-हॉटस्पॉट्स सुविधा देणार आहे. त्याचप्रमाणे दोन महिन्यांत आध्यात्मिक, साहसी व आरोग्यविषयक धोरण उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा आयटी तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी शुक्रवारी (ता.२६) केली.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी म्हापसा येथील शासकीय संकुलात मंत्री खंवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, बार्देश उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई,

बार्देश मामलेदार प्रवीण गावस, संयुक्त मामलेदार आदी उपस्थित होते. तसेच, पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर, पोलिस निरीक्षक सीताकांत नायक यांच्यासह उल्हास अस्नोडकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे मोपा विमानतळ, पूल, रस्त्यांचे रुंदीकरण असे विविध प्रकल्प हाती घेतल्याने राज्याचा सर्वच क्षेत्रात विकास झाला आहे.

पंतप्रधान मोदींच्या गोवा भेटीदरम्यान पणजी येथे रोपवे प्रकल्प आणि थ्रीडी प्रिंटिंग इमारतीसह दोन मोठे पर्यटन प्रकल्प सुरू केले जातील, असे खंवटे यांनी सांगितले.

सरकारच्या ‘विकसित भारत’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आर्थिक वाढ, पर्यावरणीय शाश्वतता व सामाजिक प्रगतीकडे वाटचाल करत आहोत. आम्ही सामाजिक प्रगती, पर्यावरणीय स्थिरतेकडे पाऊल टाकत आहोत. आम्ही महिला शक्ती, किसान कल्याण, युवा शक्ती व गरीब कल्याणच्या विकासावर लक्ष केंद्रित करत पुढे जात आहोत.
- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT