Rohan Khaunte Gomantak Digital Team
गोवा

Rohan Khaunte : गोवा-उत्तराखंड हवाई मार्गाचा पर्यटनास लाभ

पर्यटनमंत्री रोहन खंवटे : पहिल्या विमान प्रवासाने करणार नव्या हवाई मार्गाचा शुभारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा आणि उत्तराखंड ह्या दोन्ही राज्यातील पर्यटन उद्योगांना लाभ देण्याकरिता, दोन राज्यांमधील सहयोगाचा शुभारंभ करण्यासाठी पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे गोवा आणि उत्तराखंड मधील पहिल्या उड्डाणाने हवाई प्रवास करणार आहेत.

हा थेट हवाई मार्ग गोवा आणि उत्तराखंड मध्ये पर्यटकांना प्रवास करण्यासाठी सुकर आणि सोयीस्कर मार्ग पुरवण्यासाठी आणि दोन्ही राज्यांमधील अनोखी सांस्कृतिक आणि नैसर्गिक आकर्षणे शोधण्यासाठी सज्ज आहे. रोहन खंवटे म्हणाले, ‘गोवा आणि उत्तराखंड मध्ये थेट हवाई मार्गाची घोषणा करताना मला अतीव आनंद होत आहे, ज्यामुळे गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी मदत होईल.

गोव्यामध्ये पुरातत्वशास्त्रीय दृष्ट्या महत्वाची अनेक मंदिरे आहेत, जिथे आता ह्या थेट उड्डाणांद्वारे प्रवास करून सहज जाता येईल. त्याप्रमाणेच , गोव्यातील पर्यटकांना उत्तराखंड राज्याच्या विलक्षण नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेता येईल. ज्यामुळे गोवा आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांना पर्यटनदृष्ट्या फायदा होईल.

‘मनोहर’ जोडणार ‘जॉली ग्रॅंट एअरपोर्ट’शी

  • ‘इंडिया टूरिझम स्टॅटिस्टिक्स 2022’ द्वारा प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीच्या अनुसार, 2021 साली गोव्याला भेट देणाऱ्या स्थानिक पर्यटकांची संख्या 33 लाख, तर उत्तराखंडला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या तब्बल 1.9 कोटी होती. गोवा आणि उत्तराखंड दरम्यान थेट उड्डाणे सुरू झाल्यानंतर, दोन्ही राज्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होणे अभिप्रेत आहे.

  • गोव्यातील ‘मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट (मोपा) आणि उत्तराखंडमधील ‘ जॉली ग्रँट एअरपोर्ट (देहरादून) दरम्यानच्या नवीन थेट उड्डाणसेवेचे परिचालन ‘इंडिगो एअरलाइन्स’ द्वारा केले जाईल, जी प्रवाशांना आरामदायक आणि विनासायास प्रवासाचा अनुभव देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मी त्यांच्यासमोर सामान्य नेता", आरोग्यमंत्री राणेंचे आवडते मुख्यमंत्री कोण? Watch Video

IPL 2025: 13 कोटींचा खेळाडू 'यलो आर्मी'तून बाहेर! जडेजापाठोपाठ CSKचा आणखी एका स्टारला रामराम?

Ravindra Jadeja Record: रवींद्र जडेजानं रचला इतिहास, 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरला मागे टाकत केली 'ही' मोठी कामगिरी

सांताक्रूझ अपघातानंतर वीज विभागाची कारवाई; EE काशीनाथ शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली मोहीम!

भारतात DPDP कायदा लागू, Social Mediaवरील नियम अधिक कठोर होणार, काय बदल होतील? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT